नाशिक : ऑपरेशन सिंदूर संदर्भात कुठलेही उथळ वक्तव्य करू नका. कुठेही कुठल्याही विषयावर उथळपणे बोलू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांना दिला. तशा बातम्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं अनेकांनी त्यावर टीका टीप करण्यात केल्या. पण मुळात 75 तरीत पोचलेल्या नरेंद्र मोदींच्या सारख्या पंतप्रधानाला आपल्या साठी 65 त पोहोचलेल्या नेत्यांना उथळ वक्तव्य करू नका, हे सांगावेच का लागले?? हे सांगण्याची वेळच का आली?? त्यांनी आणि अमित शाह यांनी वाढविलेल्या भाजपमध्ये “राहुल गांधी” शिरलेत का??, असा सवाल करायची वेळ भाजपच्या नेत्यांच्या उथळ वक्तव्यातून आली आहे. Modi have to be told not to talk shallowly Has Rahul Gandhi entered Modi party
ऑपरेशन सिंदूरचे ब्रीफिंग करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह हे काही लहान सहान नेते नव्हेत. ते वर्षानुवर्षे मंत्री राहिलेत. भाजपच्या संस्कारांमध्ये मुरलेत. पण त्यांनी अतिउत्साहाच्या भरात पंतप्रधान मोदींची अतिस्तुती करताना कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. सुप्रीम कोर्टाने त्यांना झापले. त्यानंतर त्यांनी तीन वेळा सोशल मीडियावर माफी मागितली, पण भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांना मंत्रिपदावरून दूर केले नाही.
भाजपचे राज्यसभेचे खासदार राम चंदर जांगरा यांना देखील असेच वादग्रस्त वक्तव्य करण्याची खुमखुमी आली. पहलगाम मध्ये महिलांनी दहशतवाद्यांचा प्रतिकार केला असता, तर कमी लोक मारले गेले असते, पण महिलांमध्ये अहिल्यादेवी होळकर किंवा झाशीची राणी यांच्यासारखे शौर्य नव्हते, असे जांगरा म्हणाले. वास्तविक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या कार्यक्रमामध्ये अहिल्यादेवींच्या शौर्याची गाथा उलगडताना त्यामध्ये पहलगामचा विषय मिसळण्याची काहीच गरज नव्हती, पण जांगरा यांच्यासारख्या अनुभवी खासदाराला भान राहिले नाही.
विजय शाह आणि राम चंदर जांगरा यांनी राहुल गांधी अंगात आल्यासारखी उथळ वक्तव्ये करून भाजपलाच अडचणीत आणले. इतर काही नेत्यांनी देखील तसेच केले. राहुल गांधींनी नाही का, इधर सें आलू डालो, उधर से सोना निकालो, असली वक्तव्ये करून स्वतःचे आणि काँग्रेसचे हसू करून घेतले होते. सावरकरांच्या खोट्या माफीनाम्याचे राजकीय भांडवल करून फायदा उठवायचा प्रयत्न केला होता. पण राहुल गांधींची उथळ वक्तव्ये काँग्रेसच्याच अंगलट आली. राहुल गांधींची प्रतिमा जास्त खराब झाली. नेमके तसेच भाजपच्या नेत्यांनी करून मोदी सरकारला आणि भाजपला अडचणीत आणले. म्हणून मोदींना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उथळ वक्तव्ये करू नका, असे सांगावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App