EPFO पेन्शन, वेतनाबाबत मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; किमान वेतनात वाढ शक्य

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनाबाबत मोठी योजना तयार करत आहे. या योजनेनंतर सर्वच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार, (EPFO) कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. तर सरकार कर्मचाऱ्यांकरता देखील मोठा निर्णय लवकरच घेण्याच्या तयारीत आहे. Modi Govt’s Important Decision on EPFO Pension, Wages; Increase in minimum wage possible

किमान वेतनात होणार वाढ

सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे १५ हजार रूपये इतके आहे. त्यात वाढकरून ते आता २१ हजार रूपये करण्यात येण्याची शक्यता आहे तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढल्यानंतर त्यांच्या पेन्शनमध्येही परिणामी वाढ होणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने २०१४ मध्येही कमीत कमी किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता पुन्हा मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासंदर्भात योजना तयार करत आहे. म्हत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले तर त्यांचा पीएफचा वाटाही वाढेल.


EPFO पेन्शन ; जीवन प्रमाणपत्र कधीही सबमिट करणे शक्य


पीएफचे होणार कॉन्ट्रिब्युशन

सध्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचे गणित हे १५ हजार रूपयांवर केले जाते. यामुळे ईपीएस खात्यात जास्तीत जास्त १२५० रूपये जमा होतात. परंतु जर सरकारने वेतन वाढवले तर कॉन्ट्रिब्युशनही वाढेल. वेतन वाढल्यानंतर मासिक कॉन्ट्रिब्युशन १७४९ रूपये इतके होऊ शकते.

Modi Govt’s Important Decision on EPFO Pension, Wages; Increase in minimum wage possible

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub