वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेल मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने त्यावरील मूलभूत आयात शुल्क कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गुुरुवारी याबाबतचा आदेश काढला. सरकारने सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावरील मूलभूत आयात शुल्क गुरुवारपासून १७.५ % वरून कमी करून १२.५ % केले आहे. सुधारित आयात शुल्क ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.Modi Govt Cuts Import Duty;Edible oil will be cheaper!!
रिफाईन्ड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे. यामुळे खाद्यतेलांच्या देशांतर्गत किरकोळ विक्री किमती घटण्यास मदत होईल. रिफाईन्ड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क ऑक्टोबर २०२१ मध्ये ३२.५ % वरून कमी करून १७.५ % करण्यात आले होते. खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती २०२१ मध्ये खूप जास्त होत्या आणि देशांतर्गत किमतीवरही त्याचे परिणाम होत होते.
पामतेल आयातीत घट
भारताची पामतेल आयात मे महिन्यात १४.५९ टक्क्याने कमी होऊन ४ लाख ३९ हजार १७३ टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आहे, अशी माहिती सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) गुरूवारी दिली. मागील वर्षी मे महिन्यात पामतेलाची ५ लाख १४ हजार २२ टन आयात झाली होती.
याचबरोबर एकूण वनस्पती तेलाच्या आयातीतही यंदा किंचित घट झाली आहे. ही आयात मे महिन्यात १० लाख ५८ हजार २६३ टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १० लाख ६१ हजार ४१६ टन होती. देशाच्या एकूण वनस्पती तेल आयातीत पामतेलाचा वाटा ५९ टक्के आहे. सूर्यफुल तेलाच्या आयातीत मेमध्ये वाढून २.९५ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १.१८ लाख टन होती. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करतो. याचबरोबर अर्जेंटिनातून सोयाबीन तेल आणि युक्रेन व रशियातून सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. आगामी काळात २२.०३ लाख टन खाद्यतेलाची देशात आयात होईल, असा ‘एसईए’चा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App