केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ‘मेरा युवा भारत (MY Bharat) या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले- ‘मेरा युवा भारत’ हे तरुणांसाठी एक डिजिटल व्यासपीठ असेल. यामध्ये तरुणांमध्ये कौशल्य विकासासोबत नेतृत्व क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. Modi governments big decision for youth Union Cabinet approves Mera Yuva Bharat
ते पुढे म्हणाले “मेरा भारत-मेरा युवा भारत नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” ‘मेरा युवा भारत’ चे प्राथमिक उद्दिष्ट हे युवकांच्या विकासासाठी संपूर्ण सरकारी व्यासपीठ बनवणे आहे. ते तंत्रज्ञानावर आधारित असेल.
नवीन व्यवस्थेअंतर्गत, तरुण समाज परिवर्तनाचे एजंट आणि राष्ट्र निर्माते बनतील, ज्यामुळे त्यांना सरकार आणि नागरिकांमधील ‘युवा सेतू’ म्हणून काम करता येईल. ठाकूर म्हणाले- “राष्ट्र उभारणीसाठी प्रचंड युवा ऊर्जा वापरायची आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App