संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असताना मोदी सरकारने आज संध्याकाळी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

… त्यामुळे मोदी सरकार आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :   आजपासून (18सप्टेंबर)पासून संसदेत विशेष अधिवेशन सुरू झाले. हे सत्र 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. विरोधकांना धक्का बसेल असे  विधेयक केंद्र सरकार आणू शकते, अशी चर्चा  या अधिवेशनाबाबत आहे. दरम्यान, मोदी सरकारने आज (सोमवार) संध्याकाळी मंत्रिमंडळाची  महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. त्यामुळे मोदी सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Modi government has called an important meeting of the cabinet this evening while the special session of the parliament is going on

मंत्रिमंडळाची आजची ही बैठक सायंकाळी 6.30 वाजता बोलावण्यात आली आहे. संसदेच्या अॅनेक्सी बिल्डिंगमध्ये ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे मानले जात आहे.

मात्र ही बैठक कोणत्या मुद्द्यांवर होणार याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. सध्या या विशेष अधिवेशनाबाबत विरोधी पक्षही म्हणत आहेत की, त्यांना सरकारचा हेतू माहित नाही किंवा अधिवेशनाबाबत काहीही सांगितले नाही.

मात्र, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या अजेंड्यामध्ये चार विधेयकांचा उल्लेख आहे. यामध्ये प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023, अधिवक्ता दुरुस्ती विधेयक 2023 यांचाही समावेश आहे, जे राज्यसभेत आधीच मंजूर झाले आहेत आणि लोकसभेत प्रलंबित आहेत. उर्वरित दोन पोस्ट ऑफिस बिल 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (सेवेच्या अटी) विधेयक 2023 आहेत.

Modi government has called an important meeting of the cabinet this evening while the special session of the parliament is going on

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात