विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : लालूंचे मुस्लिम आरक्षण काँग्रेसचे कसाब समर्थन, मोदींना मिळाले आयते मुद्दे हातात, त्यांनी अहिल्यानगरात येऊन केले दोघांचे पुरते वस्त्रहरण!! Modi came to Ahilyanagar and stripped both of them
नगर मधले भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीतले शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर मध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांना टार्गेट केले. लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे संपूर्ण आरक्षण मिळाले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्याच्या आधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ वकील आणि भाजपचे मुंबईतले उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते.
पंतप्रधान मोदींच्या आजच्या अहिल्यानगरातल्या भाषणाआधी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना आयते मुद्दे हातात दिले. त्यामुळे मोदींनी आपल्या भाषणात भाषणात मुस्लिम आरक्षण आणि दहशतवादाचे काँग्रेसने केलेले समर्थन याच दोन मुद्द्यांवर भर देत लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांचे पुरते वस्त्रहरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सगळ्या संविधानकर्त्यांना देशात धर्माच्या आधारावर आरक्षण अपेक्षित नव्हते. त्यांनी ते स्पष्टपणे संविधानात नोंदविले आहे. परंतु, काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना समाजातल्या बीसी, ओबीसी, एससी, एसटी या सर्व दुर्बल घटकांचे आरक्षण त्यांच्याकडून काढून घेऊन त्यामध्ये मुसलमान समाजाला घुसवायचे आहे, असा आरोप मोदींनी केला
मोदींच्या या भाषणाचा सगळा भर देशाची सुरक्षा व्यवस्था, शेतकरी महिलांची सुरक्षा आणि समृद्धी समाजातील सर्व दुर्बल घटकांना आरक्षण यावर राहिला. मोदींनी आपल्या सगळ्या सरकारची कामगिरी अहिल्यानगरात पाठ म्हणून दाखवली. पण त्याच वेळी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांच्या मुस्लिम दृष्टीकरणाचे धोरण उघडे पाडले. देशात सध्या संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण यांच्यात संघर्ष सुरू आहे. एकीकडे मोदी सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या संतुष्टीसाठी झटत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या पाठीमागे लागले आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. अहिल्या नगरातील भाषणानंतर ते बीड कडे रवाना झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App