नाशिक : संपूर्ण जगात भारतीय सैन्य दलाच्या रचनांची वाहवा होत असताना तिच्यामध्ये नव्या युद्धाच्या आव्हानांच्या गरजांनुसार बदल करण्याचे भारतीय संरक्षण दलाने ठरविले असून या बदलांमध्ये अत्याधुनिकता आणि युद्ध परंपरा यांचा अनोखा मिलाफ करायचा निर्णय घेतलाय म्हणूनच अत्यंत गतिमान तंत्रज्ञानावर आधारित भारतीय सैन्य दलाची एकात्मिक रचना करण्यात संरक्षण दलांनी पुढाकार घेतला आहे. यात अत्याधुनिक शस्त्र आणि संपर्क साधनांसह नव्या रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन यांच्यासारख्या नव्या सैन्य रचना अस्तित्वात आणल्या जात आहेत. भारतीय सनातन हिंदू धर्म परंपरेत रुद्र आणि भैरव या युद्धदेवता मानल्या जातात. सज्जनांचे रक्षण आणि खलांचे निर्दालन या युद्धदेवता करतात. या युद्धदेवतांना अत्याधुनिक स्वरूपात वंदन करण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी आपल्या नव्या सैन्यरचनांचे नाव रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन असे ठेवले आहे.
भारतीय सैन्य दलांमधली सध्याची रचना ही ब्रिटिश काळानंतर अस्तित्वात आली. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्याच्या काळात त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांना हवी तशी भारतीय सैन्य दलाची रचना केली होती. परंतु भारतीय संरक्षण दलांनी आता पाश्चात्य गुलामगिरी वेगवेगळ्या स्तरांवर झटकून टाकून भारतीय परंपरा आणि आधुनिकता यांना साजेशी नवी रचना स्वीकारली आहे. दोनच वर्षांपूर्वी भारतीय नौदलाने आपला मुळातला लोगो बदलून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या लोगोचा समावेश केला आता त्यापलीकडे जाऊन भारतीय सैन्य दलांनी नव्या सैन्य रचनांचे नावच “रुद्र ब्रिगेड” आणि “भैरव बटालियन” असे ठेवले आहे.
– सैन्यदलांची एकात्मिक रचना
इंटरनेट, उपग्रह, ड्रोन आणि अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे आधुनिक काळातील युद्धतंत्र पूर्णतः बदलले आहे. आजच्या गरजांनुसार आपली लष्करी रचना अधिक गतिमान, तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक करण्याची गरज आहे. याच अनुषंगाने भारतीय सैन्याने काही महत्त्वपूर्ण बदल निश्चित केले आहेत. त्याचाच भाग म्हणून लष्करात “रुद्र ब्रिगेड” आणि “भैरव लाइट कमांडो बटालियन” सारख्या अत्याधुनिक रचना उभ्या केल्या जात आहेत. ज्यात इन्फन्ट्री, मेकेनायझ्ड युनिट्स, तोफखाना, टँक, विशेष दल आणि ड्रोन किंवा मानवरहीत युनिट्स यांना एका छत्राखाली कार्य करतील. या बदलाचा उद्देश जलद तैनाती, लवचिक युद्ध, स्वयंपूर्ण लॉजिस्टिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा (ड्रोन, एआय-आधारित बुद्धिमत्ता, वास्तविक-वेळ माहिती) समावेश करून विविध भूभाग — सपाट मैदान ते पर्वतीय रेषा — यासाठी तातडीने प्रभावी प्रतिसाद देण्यास सक्षम होणे हा आहे.
मोठे संरचनात्मक बदल
हे केवळ छोटे बदल नसून ते मोठे संरचनात्मक बदल आहेत. या बदलांमधून पारंपरिक साच्यांना मोडून आधुनिक युद्धपरिस्थितीशी आणि गरजा यांच्याशी जुळवून घेण्याची रणनीती आहे. रण-तयारी, एकात्मिक क्रियाशीलता आणि संसाधनांचा अधिक प्रभावी वापर या माध्यमातून साध्य होण्याची अपेक्षा आहे; परिणामी भारतीय सैन्य अधिक वेगाने आणि बहुध्रुवी पद्धतीने अडचणींचा सामना करू शकेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App