विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग गडद झाले असताना केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या Mock drill होणार आहे. यात मुंबई, पुणे ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजी नगर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
भारतात 1971 नंतर प्रथमच असे मॉक ड्रिल होत आहे. तब्बल 54 वर्षानंतर युद्धाचे सावट देशावर आले आहेत. अशावेळी नागरिकांनी साध्या साध्या गोष्टींची दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यामागील सर्वांना धडा शिकवण्याचा कडक संदेश दिला आहे. तेव्हापासून युद्धाचे ढग गडद झाले आहेत. केव्हा पण युद्धाला तोंड फुटेल, असा दावा पाकिस्तानचे नेते, मंत्री करत आहेत. भारतात 1971 नंतर मॉक ड्रिल होत आहे. तब्बल 54 वर्षानंतर युद्धाचे सावट देशावर आले आहेत. अशावेळी नागरिकांनी साध्या साध्या गोष्टींची दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
– असे असेल Mock drill
केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सुरक्षा मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून देशव्यापी मॉक ड्रिल होणार आहे. 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा सहभागी होणार आहेत. हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थी, नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हल्ला झाल्यास एकाचवेळी काळोख, अंधार करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठांनां सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या. हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठीच्या योजना आखून तयारी करण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. एक सिगारेट बेतेल जीवावर निवृत्त कर्नल आणि सरंक्षण तज्ज्ञ अभय पटर्वधन यांनी आपत्कालीन स्थितीत काय काय धोके होऊ शकतात याविषयीची सविस्तर माहिती टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. ज्यावेळी शत्रू राष्ट्राची विमानं आकाशात घिरट्या घालतील अथवा त्यांचे मिसाईल टार्गेट निश्चित करतील अशावेळी सदर शहरांमध्ये काळोख करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शत्रू राष्ट्र हल्ला करण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लाईट बंद करणे आवश्यक असतात. अशा भागात वाहनं सुद्धा फोकस लाईट बंद करून चालवावे लागतात. वाहनाच्या आतील दिवे बंद करावे लागतात. इंडिकेटर लावावे लागत नाही. घरातील दिवे बंद करावे लागतात. उजेड, प्रकाशाचा एक सिग्नल, इंडिकेटर हल्ल्यासाठी कारणीभूत ठरेल असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीने सिगारेट सुद्धा शिलगावली तर हा शत्रू साठी महत्त्वाचा दुवा ठरू शकते. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे सीमावर्ती भागात असा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. मध्य भारतासह दक्षिणेकडील राज्यांवर युद्धाचा थेट धोका नसला तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
– आपत्कालीन स्थिती काय कराल??
निवृत्त कर्नल आणि सरंक्षण तज्ज्ञ अभय पटर्वधन यांनी आपत्कालीन स्थितीत काय करावे, काय दक्षता घ्यावी याची माहिती दिली. एखादी मिसाईल शहराच्या दिशेने येण्याची खात्री पटते. तेव्हा सायरन वाजण्यास सुरुवात होते. तेव्हा नागरिकांनी सुरक्षित जागी आश्रय घ्यावा. आपल्याकडे अजून असे शल्टर नाहीत.
सायरन वाजला तर नागरिकांनी मोकळ्या पटांगणात धाव घ्यायची. त्यांनी जमिनीवर झोपायचे.
घरात तळमजला, तळघर असेल तर तिथे आश्रय घ्यायचा.
संरक्षण भिंत असेल, आडोश्याची जागा असेल पण मोठी इमारत नसेल अशा ठिकाणी लपायचे. जीव वाचावायचा. ब्लॅकआऊट बाबत सर्वांना उद्या माहिती देण्यात येईलच. हा युद्धा पूर्वीचा सराव आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App