तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम. के. स्टालिन MK Stalin यांना एकदम “नवे KCR” बनायचा मूड आलाय. या मूड मधूनच त्यांनी delimitation विरोधात छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा घाट घातलाय!! MK Stalin
तामिळनाडू विधानसभेची निवडणूक 2026 मध्ये सुरुवातीला होणार आहे. त्या दृष्टीने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची तयारी सुरू आहे पण त्यासाठी एक political momentum सेट करणे हे सत्ताधारी असल्यामुळे एम. के. स्टालिन यांच्यापुढे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या delimitation अर्थात लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना धोरणावर शरसंधान साधायला सुरुवात केली आहे. जे धोरण मुळात अजून अस्तित्वातच आलेले नाही किंवा ज्या धोरणाचे नेमके निकष देखील अजून मोदी सरकारने ठरविलेले नाहीत, त्या delimitation धोरणावर स्टालिन यांनी आपल्या पद्धतीने हल्लाबोल करत तामिळनाडूसह पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पुदुचेरी या राज्यांवर अन्याय होत असल्याची हाकाटी पिटली आहे. MK Stalin
मोदी सरकार लादत असलेल्या delimitation धोरणानुसार उत्तरेतल्या हिंदी भाषेत राज्यांमधली लोकसभा सदस्यांची संख्या वाढेल आणि दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होईल, असा स्टालिन यांचा दावा असून त्यांनी त्या संदर्भात वर उल्लेख केलेल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी केंद्र सरकारने अजून जाहीरच न केलेल्या delimitation धोरणाची निंदानालस्ती करून सगळ्यांना चेन्नईत बैठकीला बोलविले आहे.
नेमका हाच स्टालिन यांचा “नवे KCR” बनायचा डाव आहे. 2024 च्या लोकसभा निवडणूक होण्याआधी किंबहुना तेलंगणाच्या विधानसभा निवडणुका होण्याआधी KCR अर्थात चंद्रशेखर राव यांनी असाच भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. त्यामुळे चंद्रशेखर राव उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील भेटून गेले होते. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला वगैरे नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन भाजप विरोधकांची एकजूट साधायचा जोरदार प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न संपूर्णपणे अपयशी ठरला होता. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय पातळीवरची विरोधकांची एकजूट तर साधली नाहीच, पण तेलंगणात देखील त्यांना विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही. काँग्रेसने चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या सरकारचा पराभव केला होता.
आता देखील एम. के. स्टालिन असेच “केसीआर” म्हणजे “चंद्रशेखर राव” बनायची शक्यता आहे. स्टालिन यांना राष्ट्रीय पातळीवर कुठली खरी विरोधकांची एकजूट साधायची नाहीये, तर त्यांना फक्त तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका जिंकायच्यात, पण त्याचा political plot तयार करण्यासाठीच त्यांनी delimitation च्या काल्पनिक मुद्द्यावर विरोधकांची एकजूट चालायचा प्रयत्न करून त्यात भाजपचे मुख्यमंत्री माजी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना देखील ओढायचा प्रयत्न केला आहे. चंद्रशेखर राव यांना असल्या एकजूटीत अपयश आले होते, मग “नव्या चंद्रशेखर राव” यांचे 2024 मध्ये काय होईल??, हे समजायला साधारण वर्षभर वाट पाहावी लागेल!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App