नाशिक : भारताचा चिकन आवळायची बांगलादेशाने केली होती भाषा, पण भारतानेच “विशाल मन” दाखवायचा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा सल्ला!!, असे चित्र आज समोर आले. MK Narayanan
बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर तिथल्या मोहम्मद युनूस यांच्या राजवटीने भारताच्या अनेक खुसपटी काढल्या. भारताला टाळून मोहम्मद युनूस चीनला गेले. चीनशी संरक्षण आणि व्यापार करार करून भारतीय उपखंडात चीनला शिरकाव करून देण्याची तयारी चालवली. भारताचा पूर्वोत्तर भाग land-locked आहे. बंगालच्या उपसागरावर बांगलादेशाचाच हक्क आहे, अशी टिमकी मोहम्मद युनूस यांनी वाजवली होती. याच दरम्यान त्यांनी पाकिस्तानशी देखील हातमिळवणी केली. बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण झाले, तरी मोहम्मद युनूस सरकारने दंगलखोरांवर परिणामकारक कारवाई केली नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर आपण पूर्वेकडून भारतावर हल्ला करावा असा सल्ला मोहम्मद युनूस यांच्या समर्थकांनी त्यांना दिला होता. म्हणजेच भारतावर हल्ला करायची बांगलादेशाची तयारी होती. हे सगळे कारनामे लक्षात घेऊनच मोहम्मद युनूस यांच्या राजवटीने काढलेल्या वेगवेगळ्या खुसपटींना भारताने चोख उत्तर दिले. बांगलादेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लादले. त्यामुळे बांगलादेशाच्या व्यापाराला 42 % फटका बसला. या काळात चीन त्यांच्या मदतीला आला नाही. त्यामुळे मोहम्मद युनूस यांची राजवट हडबडली आणि त्यांनी भारताशी पुन्हा जुळवून घ्यायचे प्रयत्न चालू केले.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे एक वक्तव्य समोर आले. सोनिया गांधी आणि मनमोहन यांच्या काळातले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी भारतालाच उपदेशाचे डोस पाजले.
एम. के. नारायणन म्हणाले :
भारत आणि बांगलादेश हे एकमेकांचे चांगले सहकारी आहेत. त्यांच्यातल्या मतभेदांचा कुणी फायदा उठवत असले, तरी फार काळ तसे चालणार नाही. भारत हा मोठा देश आहे. बांगलादेशाच्या गरजा भागवण्याची भारताची क्षमता आहे. बांगलादेशाला जे हवे, ते भारताने दिले पाहिजे. कोणत्याही मतभेदाच्या वेळी मोठ्या देशाने उदारमतवाद दाखवला पाहिजे. भारताने आपले मन विशाल करून बांगलादेशाला मदत केली पाहिजे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मैत्री संबंध कधी तुटतील असे मला वाटत नाही. कारण आपण दोन्ही मित्र आणि शेजारचे देश आहोत.
अशा शब्दांमध्ये एम के नारायणन यांनी भारतालाच उपदेश केला. हे तेच एम. के. नारायणन आहेत, जे 2005 ते 2010 या पाच वर्षांच्या कालावधीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. ते त्या पदावर असतानाच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी आपल्या गुप्तचर माहितीत त्रुटी आढळल्याचे सांगून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती, पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचा राजीनामा नाकारला होता.
पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक नाकारला
मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तान वर सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करण्याचा सल्ला त्यावेळच्या लष्कर प्रमुखांनी आणि हवाई दल प्रमुखांनी सरकारला दिला होता. पण एम. के. नारायणन हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारने त्यांच्या सल्ल्यानुसार लष्कर प्रमुख आणि हवाई प्रमुख यांचा सल्ला नाकारला होता.
आता बांगलादेशाने भारताशी गद्दारी करायचे चालविल्यानंतर भारताने व्यापारी निर्बंध लादून बांगलादेशाला धडा शिकवला. त्याच्या पुढची देखील कठोर पावले टाकायला सुरुवात केली. नेमक्या त्याचवेळी एम. के. नारायणन यांनी पुढे येऊन भारताला आपले “मन विशाल” करण्याचा सल्ला देऊन बांगलादेशाची मदत करायला सांगितले. यासाठी त्यांनी अत्यंत उत्तम दर्जाच्या इंग्रजीत राजनैतिक भाषा वापरली, पण प्रत्यक्षात त्यांनी मोदी सरकारवर काँग्रेसी शरणागतीचाच अजेंडा लादायचा डाव खेळला!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App