महाराराष्ट्रातील कोरोनाचा कहर वाढत असताना महाविकास आघाडीचे मंत्री जनतेला मदत करण्याऐवजी केंद्रावर दुगाण्या झाडण्यात मग्न आहेत. त्यांना केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सुनावले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राची परिस्थिती अमेरिकेपेक्षाही भयानक झाली असून, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारवर औषधे, ऑक्सिजनबाबत आरोप करण्यापेक्षा राज्यातील जनतेला वेळेवर उपचार कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करून दिलासा द्यावा, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. Ministers should pay attention to the people instead of blaming the Center, advises Ramdas Athavale
विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराराष्ट्रातील कोरोनाचा कहर वाढत असताना महाविकास आघाडीचे मंत्री जनतेला मदत करण्याऐवजी केंद्रावर दुगाण्या झाडण्यात मग्न आहेत. त्यांना केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सुनावले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राची परिस्थिती अमेरिकेपेक्षाही भयानक झाली असून, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारवर औषधे, ऑक्सिजनबाबत आरोप करण्यापेक्षा राज्यातील जनतेला वेळेवर उपचार कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करून दिलासा द्यावा, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी टँकरमधील ऑक्सिजन भरताना गळती होऊन २४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्याची पाहणी करण्यासाठी आले असताना म्हणाले, नाशिकची घटना दुदैर्वी असून, या घटनेपाठोपाठ विरारची घटना अतिशय धक्कादायक आहे.
अगोदरच कोरोनामुळे जनता हवालदिल झालेली असताना यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे घडत असलेल्या घटना पाहता, राज्य सरकारने अशा घटना टाळण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून घटनांची चौकशी करावी व दोषींना शासन करावे तसेच जखमींना योग्य ती मदत व मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App