विशेष प्रतिनिधी
भोपाळ: Colonel Sophia Qureshi ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि रात्री 11.15 वाजता विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. Colonel Sophia Qureshi
कर्नल सोफिया कुरेशी यांना केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका दिली होती. त्यानंतर त्या देशभरात प्रशंसेच्या पात्र ठरल्या. तथापि, कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी त्यांच्या कार्यावर आक्षेप घेत आक्षेपार्ह विधान केले होते. विजय शाह यांच्या विधानाची स्वतः दखल घेत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्या. अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मध्य प्रदेश पोलीस महासंचालकांना हे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा वक्तव्यानंतर विजय शाह यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता. यासोबतच राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांना देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल व्हायलाच हवा.
इंदोर जिल्ह्यातील मानपूर भागात आयोजित एका कार्यक्रमात विजय शाह यांनी हे विधान केले होते: ज्यांनी आमच्या महिलांच्या कुंकवावर घाला घातला, ज्यांनी आमच्या पर्यटकांना मारले, आम्ही त्यांच्याच बहिणीला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले आणि मोदींनी त्यांच्या बहिणीला आमच्या विमानातून त्यांच्या घरी पाठवून त्यांना वाईट वागणूक दिली. आणि इशारा दिला की, जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले, तर तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला धडा शिकवेल. शाह यांच्या या वक्तव्याचा संबंध कर्नल सोफिया कुरेशी यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या विधानावर जोरदार टीका होत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर राजकारणही तीव्र झालं असून, मध्य प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनी मंत्री विजय शाह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांना 24 तासात पदावरून हटवले नाही, तर देशभरातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रार केली जाईल. इंदोरच्या महिला कॉंग्रेस नगरसेविका यशस्वी अमित पटेल यांनी विजय शाह यांचे तोंड काळे करणाऱ्यासाठी 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यांचा आरोप आहे की, अशा पद्धतीचे राजकारण मंत्र्यांना शोभत नाही आणि अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App