काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: रविवारी सकाळी याबाबत माहिती दिली. याशिवाय ते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. Milind Devaras first reaction after giving leave to Congress

त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर लिहिले, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा संपला आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.


राहुल यांच्या ‘न्याय’ यात्रेपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, मिलिंद देवरांनी दिला राजीनामा


मिलिंद देवरा हे आज, रविवारी (१४ जानेवारी) एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नी विकासाच्या मार्गावर निघालो आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. देवरा काँग्रेस सोडून सेनेत जातील, असा अंदाज याआधीही लावला जात होता, मात्र एक दिवसापूर्वीच त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

नुकतीच काँग्रेस कार्यकारिणी जाहीर झाली तेव्हा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे संयुक्त खजिनदारपदाची जबाबदारी दिली होती, मात्र याच्या काही दिवसांनी त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण इंडिया आघाडी असल्याचे बोलले जात आहे.

Milind Devaras first reaction after giving leave to Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub