वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीन भारतातील लोकसभा निवडणुका उधळण्याचा प्रयत्न करेल, असा इशारा टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने दिला आहे. तैवानमध्ये जानेवारीत झालेल्या निवडणुकीतही चीनने असेच काहीसे केले होते.Microsoft’s Serious Warning- China Can Influence Indian Elections; Preparing to mislead voters through AI
मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट इंटेलिजन्स टीमने सांगितले की, चीन मतदारांचा राजकीय पक्षांकडे कल बदलण्याचा किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. तो सोशल मीडियावर अशा प्रकारचा मजकूर पोस्ट करेल, ज्यामुळे निवडणुकांदरम्यान चीनच्या बाजूने जनमत प्रभावित होऊ शकते.
सीमावादामुळे भारताचा शेजारी देश म्हणून चीनची प्रतिमा चांगली नाही. पोस्टच्या माध्यमातून चीन आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करेल.
थ्रेट इंटेलिजन्स टीमनुसार, उत्तर कोरियासह चीन समर्थित सायबर गट 2024 मध्ये होणाऱ्या अनेक देशांच्या निवडणुकांना लक्ष्य करणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही चीन हीच रणनीती वापरण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतात लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला, तर शेवटच्या टप्प्याचे मतदान 1 जूनला होणार आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे.
63 देशांमध्ये संसदीय-राष्ट्रपतींच्या निवडणुका, चीन फायदा घेणार
2024 हे वर्ष जगाच्या लोकशाही इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. या वर्षी 63 देशांमध्ये (आणि युरोपियन युनियन) अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुका होणार आहेत. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 49% लोक मतदानाचा हक्क बजावतील.
मायक्रोसॉफ्टने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “या वर्षी जगभरात, विशेषत: भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. आमचे आकलन असे आहे की चीन AI जनरेटेड कंटेंट तयार करेल ज्यामुळे त्याच्या फायदा होईल आणि तो लोकांपर्यंत पोहोचेल. ”
AI जनरेटेड कंटेंटचा भविष्यात अधिक प्रभाव पडेल
ब्रिटीश मीडिया “द गार्डियन” ने अहवालात लिहिले आहे की मायक्रोसॉफ्टने चीनच्या या कारवाईचा प्रभाव भविष्यात वाढेल असा इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, “एआय जनरेटेड कंटेंटचा तत्काळ प्रभाव कमी दिसतो, परंतु चीन ज्या प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे, त्याचा परिणाम भविष्यात अधिक प्रभावी होऊ शकतो.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App