प्रतिनिधी
मुंबई : रस्ते वाहतूक आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी शहरांतर्गत मेट्रोची बांधणी करण्यात आली आहे. रेल्वेतल्या गर्दीपासून आणि रस्त्यावरच्या गोगांटापासून मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळतो. या पाठोपाठ आता आणखी एक सुविधा मिळणार आहे. ही सुविधा ना रेल्वे प्रशासन देते आहे ना बेस्ट. Metro travel more secure now; Passengers will get insurance
मिळणार एक्स्ट्रा कवच
मुंबईत नव्याने पूर्ण रुपात सुरू झालेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ च्या प्रवाशांना यापुढे एक विशेष सुविधा मिळणार आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा कवच मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा मेट्रोवरील विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. या दोन्ही मेट्रोंचे संचालन मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) ही कंपनी करते आहे.
विमा वाचवणार आर्थिक संकट
या विम्यामुळे नागरिक निश्चिंत होऊन प्रवास करू शकणार आहेत. एमएमएमओसीडब्ल्यू नुसार या विमा योजनेचे संरक्षण त्यांनाच मिळणार आहे, ज्यांच्याकडे पुढील गोष्टी असतील.
वैध तिकीट
पास
स्मार्ट कार्ड
क्यूआर कोड
वैध परवानगी
या परिसराला सुरक्षाकवच
हा विमा मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे. मेट्रो स्थानकाची इमारत, फलाट, स्थानक परिसरात जर मेट्रो स्टेशन इमारतीच्या बाहेर दुर्घटना झाली, तर नागरिकाला विमा योजनेचे संरक्षण मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App