विशेष प्रतिनिधी
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या अयोध्या दौऱ्यात जसा महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा समावेश होता, तसाच सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्काच्याही कार्यक्रमाचा समावेश होता या संपर्क कार्यक्रमातूनच पंतप्रधान मोदींनी निषाद परिवारातील मीरा मांझी यांच्या घरी जाऊन चहापान केले. मीरा मांझी या उज्ज्वला योजनेतील 10 कोटीव्या लाभार्थी आहेत.Mere ghar to Bhagwan aa gaye hain; Prime Minister Modi’s sudden tea party at Meera Manjhi of Nishad family!!
अयोध्येतील निषाद गल्लीतील धनीराम मांझी यांच्या घरात अधिकारी पोहोचले आणि तुमच्याकडे एक मोठे नेता जी जेवायला येऊ शकतात, असे सांगितले. अधिकारी अचानक आल्याने मांझी परिवार गडबडला. त्यांनी ताबडतोब काही खायला केले आणि साधारण पाऊण तासाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी धनीराम आणि मीरा मांझी यांच्या घरी पोहोचले. साक्षात पंतप्रधान मोदींना बघून हे दोघेही पती-पत्नी अक्षरशः चकित झाले. मेरे घर तो भगवान आए हैं, अशा भावना मीरा मांझी यांनी व्यक्त केल्या.
Uttar Pradesh | PM Narendra Modi during his Ayodhya visit visited the house of a Ujjwala beneficiary and had tea at her residence pic.twitter.com/A7X9duuKmA — ANI (@ANI) December 30, 2023
Uttar Pradesh | PM Narendra Modi during his Ayodhya visit visited the house of a Ujjwala beneficiary and had tea at her residence pic.twitter.com/A7X9duuKmA
— ANI (@ANI) December 30, 2023
मोदींनी त्यांना तुम्ही काय केले आहे??, असे विचारले त्यावर त्यांनी सगळा स्वयंपाक तयार असल्याचे मोदींना सांगितले. परंतु मोदींनी त्यांच्याकडे चहाची फर्माईश केली. मीरा मांझी यांनी ताबडतोब चहा करून तो मोदींना दिला आणि मोदींनी मांझी परिवारासमवेत चहापान केले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. अचानक घडलेल्या या सगळ्या घडामोडीमुळे मांझी परिवार अक्षरशः भारावून गेला.
कोणी नेता आपल्या घरी जेवायला येणार आहे, हे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण हे नेते दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. परंतु ते प्रत्यक्षात घडल्यानंतर मात्र मांझी परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App