न्यूयॉर्क – सध्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये जगाचे बदलेले वास्तव प्रतिबिंबीत होत नाही, या रचनेत सुधारणा करण्याची नितांत आवश्येकता असून काही निवडक देश त्यात अडथळा आणत आहेत, अशी टीका परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. Menakshi Lekhi says try to expand Un council
एका मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रांची स्थापना होऊन ७५ वर्षे झाली आहेत. मात्र, या संस्थेच्या रचनेत, विशेषत: सुरक्षा समितीमध्ये काहीही बदल झालेला नाही. यामुळे या संस्थेचाच जीव गुदमरत आहे. मानवतेच्या भल्यासाठी काम करण्यावर भारताचा विश्वा स असून आम्ही कायमच मैत्री आणि सहकार्यासाठी तयार आहोत. लेखी या सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
भारतीय वकीलातीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मीनाक्षी लेखी यांनी अमेरिकेतील भारतीयांचे कौतुक केले. ‘‘येथील भारतीयांनी त्यांनी स्वीकारलेल्या देशाच्या भल्यासाठी मोठे योगदान दिले आहे. भारतीय जेथे राहतात, त्या समुदायामध्ये मिसळून जातात. मानवजातीच्या कल्याणासाठी काम करण्यावर आपला विश्वाेस असतो. भारत कायमच शांततेचा आणि सर्वांच्या विकासाचा समर्थक देश राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App