पंजाब नॅशनल बँकप्रकरणी फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी मैत्रीणीबरोबर मजा करण्यासाठी डोमिनिकामध्ये गेला होता. तेथेच त्याला अटक करण्यात आली, असा गौप्यस्फोट अॅँटिगा आणि बाबुर्डाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी केली आहे.Mehul Choksi flew to Dominica to have fun with his girlfriend, Antigua and Baburda Prime Minister Gaston Brown
विशेष प्रतिनिधी
बार्बाडोस : पंजाब नॅशनल बँकप्रकरणी फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी मैत्रीणीबरोबर मजा करण्यासाठी डोमिनिकामध्ये गेला होता. तेथेच त्याला अटक करण्यात आली, असा गौप्यस्फोट अॅँटिगा आणि बाबुर्डाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी केली आहे.
मेहुल चोक्सीच्या वकीलाने आरोप केला आहे की, 23 मे रोजी भारतासाठी काम करणाऱ्या अँटिगाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याचे अपहरण केले होते. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. तसेच एका जहाजातून त्याला डोमिनिकामध्ये नेण्यात आले, तिथे त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पंतप्रधान गैस्टन ब्राउन यांनी सांगितले की, मेहुल चोक्सीची चुकी आहे. तो कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर डोमिनिकामध्ये काही चांगला वेळ व्यतित करण्यासाठी गेला होता. तिथे त्याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला भारतात पाठविले जाऊ शकते.
पंजाब नॅशनल बँकप्रकरणी फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिगामध्ये राहत होता. त्याला डॉमिनिकामध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पलायनाचे अनेक किस्से सांगितले जात आहेत.
त्याला आणण्यासाठी भारताने खास विमानदेखील तिकडे पाठविले आहे. परंतू आता अँटिगा आणि बाबुर्डाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी त्यांच्या देशातून चोक्सीच्या गायब होण्यामागे खळबळजनक दावा केला आहे.
पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिगा आणि बाबुर्डा या देशांमध्ये लपला होता. मेहुल रविवारपासून बेपत्ता होता. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला होता.
यानंतर तो बोटीने किंवा विमानाने डॉमिनिकाला पसार झाल्याचे सांगितले जात आहे.ब्राउन म्हणाले, भारतीय अधिकारी विमान घेऊन चोक्सीला नेण्यासाठी डोमिनिकाला आले आहेत. त्यांच्यासोबत पुरावे आहेत.
चोक्सीला पुन्हा अंटिगाकडे सोपविले तर तो इथे पुन्हा मजेत राहिल. त्याला व्यवसाय, गुंतवणुकीच्या आधारावर व्हिसा देण्यात आला होता. तो आता विरोधी पक्षांना अर्थपुरवठा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App