भारतात राहून भारताशी वैर; मेहबूबा मुफ्तींच्या गळ्यातून पाकिस्तानी सूर; म्हणाल्या, सिंधू जल करार स्थगित करून भारताने केली चूक!!

Mehbooba Mufti

नाशिक : operation sindoor दरम्यान अवघ्या चार दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच ठोकून काढल्यानंतर सगळ्या भारतात त्याचा आनंद झालेला दिसतोय, पण पाकिस्तानला धुतल्यामुळे इथली लिबरल जमात मात्र दुःखात लोटली गेली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करून देखील लिबरल जमातीचे दुःख कमी व्हायला तयार नाही, याचेच प्रत्यंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यातून आज आले. मेहबूबा मुफ्ती यांच्या गळ्यातून आज पाकिस्तानी सूर उमटले. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने चूक केली. ती चूक सरकारने सुधारावी, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली.Mehbooba Mufti favours Pakistan over Indus water treaty

या त्याच मेहबूबा मुक्ती आहेत, ज्यांची बहीण रुबैया सईद मुफ्ती हिला दहशतवाद्यांच्या ताब्यातून सोडवून घेण्यासाठी त्यांचे वडील गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भारत सरकारने अटक केलेल्या यासीन मलिक आणि अन्य तीन दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडून दिले होते. आज त्याच मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या गळ्यातून पाकिस्तानी सूर काढले.



भारताने सिंधू जल करार स्थगित करू नये, यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडले. तो करार स्थगित केल्यानंतर भारताने पाण्याचे शस्त्रीकरण (weaponization) करू नये, अशी गळ घातली. Composite dialogue च्या नावाखाली पाकिस्तानने भारताबरोबर सिंधू जल करार आणि 370 कलमावर चर्चा करायचा घाट घातला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि उपपंतप्रधान परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत तशी निवेदने केली.

पण भारताने सिंधू जल करार आणि 370 कलम या दोन्ही मुद्द्यांवर ठाम भूमिका घेऊन पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाकारली. दहशतवाद कायमचा थांबविणे आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर वरचा ताबा सोडून देणे तो भाग भारताच्या ताब्यात पुन्हा देणे या मुद्द्यांवरच पाकिस्तानशी चर्चा होईल, अशी ठाम भूमिका मोदी सरकारने घेतली. रक्त आणि पाणी, दहशतवाद आणि चर्चा एकत्र वाहणार आणि होणार नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पण भारतामध्ये राहून भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या मेहबूबा मुफ्ती यांनी मात्र भारताच्या विरोधी भूमिका घेत पाकिस्तानी सूर गळ्यातून काढले.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या :

सिंधू जल करार स्थगित करून भारताने चूक केली आहे. ती चूक केंद्र सरकारने दुरुस्त करावी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आत्ताच थांबले आहे. त्यामुळे भारताने कुठलेही चिथावणीखोर कृत्य करू नये.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तुलबूल प्रकल्प बांधण्याचा बाता करू नयेत. कारण त्यामुळे पाकिस्तानला चिथावणी मिळेल.

2000 मध्ये उमर अब्दुल्ला केंद्रीय मंत्री होते आणि फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी दिल्लीला 7 धरणांचे प्रकल्प फुकट दिले होते, हे उमर अब्दुल्ला विसरले.

सिंधू जल करारात भारताच्या वाट्याला आलेले सगळे पाणी आपण वापरत नाही. जम्मू काश्मीरला त्या पाण्याचा पूर्ण लाभ देऊ शकत नाही. मग सिंधू जल करार स्थगित करून सरकार काय करणार आहे??

सिंधू जल करार स्थगित ठेवून सरकार आणि उमर अब्दुल्ला उगाच पाकिस्तानला चिथावणी देत आहेत. त्यामुळे युद्ध पुन्हा भडकेल. जम्मू काश्मीरच्या लोकांचे पुन्हा नुकसान होईल.

मेहबूबा मुक्ती यांचे हेच वक्तव्य पाकिस्तानसाठी चिथावणीखोर ठरणारे आहे. भारतात राहून भारताशी वैर घेणारे आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 27 भारतीयांना त्यांचा धर्म विचारून मारले, त्यावेळी काश्मीरची “शहादत” मेहबूबा मुक्ती यांना आठवली नाही. त्यावेळी त्यांनी फक्त दहशतवाद्यांचा “तोंडी” निषेध केला. पण भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सारखी कठोर कारवाई केल्याबरोबर मेहबूबा मुफ्ती यांना हा देश महात्मा गांधींचा असल्याचे “अचानक” आठवले. महात्मा गांधी हिंसाचाराच्या विरोधात होते हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मेहबूबा मुफ्ती यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेचा उपदेश पाकिस्तानला किंवा पाकिस्तानी दहशतवाद्यांना केला नाही, तो त्यांनी भारत सरकारला केला.

कारगिल मध्ये पाकिस्तानी सैनिकांना घुसखोर‌ म्हणून पाठवणाऱ्या परवेज मुशर्रफ यांना देखील महात्मा गांधी आठवले होते, पण ते घुसखोर पाठवताना आठवले नव्हते, तर भारताने कारगिल मध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आठवले होते. पाकिस्तानी सैनिकांना कारगिल मधून खदेडून काढल्यानंतर ज्यावेळी वाजपेयी सरकारने मुशर्रफ यांना आग्रा समीटसाठी बोलावले होते, त्यावेळी त्यांना भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, असा साक्षात्कार झाला होता. भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पांढरी शेरवानी घालून महात्मा गांधींच्या समाधीला भेट देऊन पुष्पचक्र वाहिले होते.

मेहबूबा मुफ्ती यांना देखील भारताने सिंधू जल करार रद्द केल्याचे दुःख असेच नकराश्रूंसारखे आहे म्हणजेच मगरीच्या अश्रूंसारखे आहे, त्यापलीकडे काही नाही.

Mehbooba Mufti favours Pakistan over Indus water treaty

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात