Meghalaya Election: कोनराड संगमा दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदी उपस्थित असणार

CM Sangama

राज्यापाल फागू चौहान यांची भेट घेऊन सरकार बनवण्याचा दावाही सादर केला

प्रतिनिधी

Conrad Sangama Meets Governor: मेघालयात विधानसभा निवडणूक निकालानंतर कोनराड संगम यांची नॅशनल पीपल्स पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. यानंतर शुक्रवारी संगमा यांनी राज्यापाल फागू चौहान यांची भेट घेऊन सरकार बनवण्याचा दावाही सादर केला आहे. एनपीपीने राज्याच्या ५९ जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी २६ जागां जिंकल्या. संगमा यांनी म्हटले की भाजपा, एचएसपीडीपी आणि दोन अपक्षांचे त्यांना पाठबळ मिळाले आहे. त्यांनी सरकार बनवण्यासाठी ३२ आमदारांचे समर्थन पत्र राज्यपालांना सोपवलं आहे. Meghalaya Election: Konrad Sangma will take oath as Chief Minister for the second time; Prime Minister Modi will be present


‘’जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या” आशिष शेलारांचं विरोधकांना खुलं आव्हान!


संगमा यांनी सांगितलं की, मी राज्यपालांना अनेक पक्षांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं. एकूण मिळून आमच्याकडे ३२ आमदारांचे समर्थन आहे. एनपीपीच्या २६ आमदारांशिवाय भाजपा आणि एचएसपीडीपीचे दोन-दोन आमदार आणि दोन अपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे. याशिवाय त्यांनी सांगितले की शपथग्रहण समारोह ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या प्रसंगी हजर असतील.

आणखी काही आमदारांशी सुरू आहे बोलणी –

याचबरोबर संगमा यांनी म्हटले की, या सर्व आमदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. आम्ही आणखी पक्षांशी आणि त्यांच्या आमदारांशी बोलत आहोत. त्यामुळे आगामी काळात समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आमदारांना हायजॅक करत असल्याचा संगमांवर आरोप –

विरोधकांनी एनपीपीवर आमदारांना हायजॅक करत असल्याचा आरोप केला आहे. यावर प्रत्युत्तर देताना संगमा यांनी सांगितले की, कोणीच कोणाचे अपहरण केले नाही. आम्हाला त्यांचे संपूर्ण पाठबळ मिळाले आहे. या अगोदर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, यूडीपी, पीडीएफ आणि वीपीपीसह अन्य पक्षांनी सरकार स्थापनेसाठी चर्चा केली.

Meghalaya Election: Konrad Sangma will take oath as Chief Minister for the second time; Prime Minister Modi will be present

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात