वृत्तसंस्था
मॉस्को : राशियातील सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड कंपनीने घेतला आहे. रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले. McDonald’s decision to close hotels in Russia; Protest against the attack on Ukraine
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर नरसंहार झाला आहे. त्याचे मोठे दुःख मॅकडोनाल्ड कंपनीला झाले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी कंपनीने हॉटेल बंद ठेवली आहेत.
रशियात मॅकडोनाल्ड कंपनीची ८५० हॉटेल आहेत. तेथे ६२००० कर्मचारी काम करतात. हॉटेल बंद केली तरी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस केंम्पकसेन्सकी यांनी दिली. हॉटेल केव्हा सुरु होतील हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App