मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वतंत्र सवता सूभा; काँग्रेस + अखिलेशच्या पोटात आला गोळा!!

विशेष प्रतिनिधी

लखनौ : मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वतंत्र सवता सूभा; काँग्रेस + अखिलेशच्या पोटात आला गोळा!!, अशी वेळ मायावतींच्या आजच्या पत्रकार परिषदेतल्या घोषणांनी आणली आहे. मायावतींनी आज वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशासह संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांची बहुजन समाज पार्टी देशातल्या कोणत्या युती अथवा आघाडीत सामील होणार नाही. “हत्ती” या चिन्हावर सगळे उमेदवार स्वतंत्रपणे उभे करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. Mayawati’s independence in Uttar Pradesh

समाजवादी पार्टीचे नेते दुटप्पी वागतात. बहुजन समाज पार्टीच्या मतांचा शेअर घेतात, पण त्यांना सत्तेचा वाटा कधी देत नाहीत, असा आरोप मायावतींनी केला. आपल्या रिटायरमेंटची अफवा समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी पसरवली, परंतु आपण अजिबात रिटायर होणार नाही. पक्षाचे काम जोमानेच करत राहू, असे त्यांनी जाहीर केले. त्याच वेळी त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याचे स्वागत देखील केले.

पण मायावतींच्या स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या पोटात गोळा आला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मते मायावती कापणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार असा त्यांचा होरा आहे त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी मायावती यांच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.

उत्तर प्रदेशात मायावतींच्या समाजवाद बहुजन समाज पार्टीचा फक्त 1 आमदार आहे, पण 2019 मध्ये त्यांनी त्याच राज्यात लोकसभेच्या तब्बल 10 जागा जिंकून दाखवल्या होत्या. उलट समाजवादी पार्टीला फक्त लोकसभेच्या 5 जागा जिंकता आल्या होत्या आणि काँग्रेसच्या वाट्याला तर केवळ 2 जागा आल्या होत्या.

पण स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा मायावतींच्या निर्णयावर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी टीका करण्याचे कारण त्यांनी जिंकलेल्या जागांमध्ये नसून मायावतींना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत आहे. मायावतींनी उत्तर प्रदेशात 2019 मध्ये लोकसभेच्या 10 जागा जिंकताना 19.26 % मिळवली होती, तर 2022 मध्ये विधानसभेच्या जागा सर्व जागा लढवताना 13 % मते मिळवली होती. भले त्यांच्या बहुजन समाज पार्टीला विधानसभेत फक्त एकच जागा जिंकता आली, पण त्यांच्या या सर्वांत खराब परफॉर्मन्स मध्ये देखील मायावतींनी तब्बल 13 % मते मिळवली होती. ही खरी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 37.8 % मते मिळून पक्षाने 62 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. याचा अर्थ उत्तर प्रदेशात अर्थ तब्बल 60 ते 62 % मते भाजपच्या विरोधात आहेत, असे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नेते मानतात. त्या मतांच्या एकजुटीसाठी या दोन्ही पक्षांचे स्वतंत्रपणे प्रयत्न चालले आहेत, पण ही एकजूट अखिलेश यादव अथवा काँग्रेस नेते काँग्रेसचे अतिवरिष्ठ नेते यांच्याकडून होत नाही. त्यामुळेच त्यांना मायावतींच्या मतांच्या टक्केवारीचा आपल्याला फटका बसण्याची भीती वाटते, म्हणूनच त्यांनी मायावतींच्या लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

Mayawati’s independence in Uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात