‘दिल मिले न मिले, हाथ मिलाते रहिए’ पाटणातील विरोधकांच्या बैठकीवरून मायावतींचा नितीश कुमारांना टोला!

BSP Candidates List Mayawati announces first phase list of BSP candidates, read more

काँग्रेस आणि भाजपावरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पाटणामध्ये आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीची बसपा प्रमुख मायावती यांनी खिल्ली उडवली आहे. सर्व विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्या म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केल्याने ‘दिल मिले ना मिले, हाथ मिलाते रहे’ या म्हणीचा प्रत्यय येतो. Mayawati criticizes Nitish Kumar over the meeting of opposition parties in Patna

एकापाठोपाठ एक ट्विट करून मायावतींनी विरोधी पक्षांच्या एकजुटीची खिल्ली उडवली. याशिवाय भाजपा आणि काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, या पक्षांमध्ये समतावादी संविधान लागू करण्याची क्षमता नाही.

मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘’महागाई, गरिबी, बेरोजगारी, मागासलेपण, निरक्षरता, जातीय द्वेष, धार्मिक उन्माद/हिंसा इत्यादींनी ग्रासलेल्या देशातील बहुजनांच्या दयनीय अवस्थेवरून हे स्पष्ट होते की बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी, समतावादी संविधान योग्यरित्या अंमलात आणले गेले पाहिजे. काँग्रेस, भाजपा या पक्षांमध्ये हे करण्याची क्षमता नाही.’’

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये मायावतींनी विरोधी पक्षांवर ताशेरे ओढले आणि म्हटले की, “आता, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष एकत्र जे मुद्दे मांडत आहेत, अशा स्थितीत २३ जूनला विरोधी पक्षनेत्यांच्या पाटणातील बैठकीत, नितीश कुमार ‘दिल’ ‘मिले ना मिले हाथ मिलाते रहो’’ या म्हणीचा अधिक प्रत्यत आणून देतात.

Mayawati criticizes Nitish Kumar over the meeting of opposition parties in Patna

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात