विशेष प्रतिनिधी
लखनऊ : धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्या दोन मौलानांसह 12 दोषी व्यक्तींना लखनऊच्या NIA कोर्टाने जन्मठेपेची सजा सुनावली उत्तर प्रदेश सरकारने मंजूर केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचा बडगा या इस्लामी जिहादींच्या पाठीत हाणला. मौलाना कलीम सिद्दिकी आणि मौलाना उमर हे दोन मौलाना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर जिल्ह्यात धर्मांतराचे रॅकेट चालवत होते. गरीब, महिला, दिव्यांग आणि मुले त्यांच्या विशेषत्वाने टार्गेटवर होते. त्यांना मदतीच्या नावाखाली विदेशातून फंडिंग घेऊन हे मौलाना कलीम सिद्दिकी आणि मौलाना उमर धर्मांतराचे रॅकेट चालवत होते. NIA कोर्टाने या मौलानांच्या कारनाम्यांची दखल घेऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गरीब व्यक्ती, महिला, दिव्यांग आणि मुले यांच्या मदतीसाठी हे दोन मौलाना विदेशातून फंडिंग गोळा करत होते. त्या फंडिंग मधून छुप्या पद्धतीने त्यांचे धर्मांतराचे रॅकेट सुरू राहिले होते. राहुल भोला, मन्नू यादव उर्फ अब्दुल मन्नान मोहम्मद, सलीम कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिक हे सगळे त्यांना मदत करत होते.
Nagpur Mihan : नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य
गरीब व्यक्ती महिला दिव्यांग व्यक्ती किंवा तरुण मुले यांना एकटे गाठून त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवून त्यांना मदतीचा बहाणा करून ते त्यांना धर्मांतरासाठीची चिथावणी देत असत. त्यांना मौलाना कलीम आणि मौलाना उमर यांच्याकडे घेऊन येत असत. हे दोन मौलाना संबंधितांच्या धर्मांतराचे काम छुप्या पद्धतीने चालवत असत.
2021 मध्ये नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अर्थात NIA ने या धर्मांतर रॅकेटच्या पर्दाफाश केला. या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्याविरुद्ध NIA कोर्टात खटला चालवला. आता कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचा बडगा या इस्लामी जिहादींवर कोर्टाने हाणला आहे. मौलाना कलीम आणि मौलाना उमर यांना जन्मठेपेची, तर बाकीच्या चौघांना प्रत्येकी 10 वर्षांची, तर उरलेल्यांना प्रत्येकी 4 वर्षांची सजा फर्मावली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more