कुवेतमधील इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक भारतीय कामगार होरपळले

मृतांमध्ये काही भारतीयांचीही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


विशेष प्रतिनिधी

दुबई: कुवेतमधील कामगारांच्या घरांच्या इमारतीत बुधवारी भीषण आग लागली. या अपघातात 41 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आखाती देशातून आलेल्या बातम्यांनुसार, मृतांमध्ये काही भारतीयांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुवेतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नरेटच्या मंगफ भागात असलेल्या सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात बुधवारी पहाटे आग लागली. कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के (10 लाख) भारतीय आहेत. हे 30% (सुमारे 9 लाख) कर्मचारी आहेत.Massive fire breaks out in building in Kuwait 41 dead over 30 Indian workers injured



या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते, जे एकाच कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे राहणारे अनेक कर्मचारी भारतीय आहेत. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे सर्व संबंधितांना विनंती आहे की अपडेट्ससाठी या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. दूतावास शक्य ती सर्व मदत देण्यास वचनबद्ध आहे.”

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कुवैत सिटीमध्ये आगीची बातमी ऐकून खूप दुःख झाले. तर 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 50 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. आमचे राजदूत घटनास्थळी गेले आहेत. आम्ही पुढील माहितीची वाट पाहत आहोत.”

Massive fire breaks out in building in Kuwait 41 dead over 30 Indian workers injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात