वृत्तसंस्था
मुंबई : ED office फोर्ट येथील बलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीत मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ईडी कार्यालयातील कागदपत्रे, फाइल्स आणि फर्निचर जळून खाक झाले. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सकाळी 9 वाजता आग नियंत्रणात आली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र चौकशी फाइल्स जळाल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.ED office
महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीला धक्का?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक फसवणूक (१२२ कोटी), ललित टेकचंदानी मालमत्ता प्रकरण (४४.०७ कोटी), विंध्यवासिनी ग्रुप बँक फसवणूक (७६४.४४ कोटी), साई ग्रुप फ्लॅट फसवणूक (७२ कोटी), पॅनकार्ड क्लब्स गुंतवणूक फसवणूक (४५०० कोटी), रियाल्टो एक्झिम आणि पुष्पक बुलियन प्रकरण (१४२.७२ कोटी) NSEL फसवणूक प्रकरण (५५७४ कोटी) महादेव बेटिंग अॅप घोटाळा (₹४०,००० कोटी), सुप्रीम कन्स्ट्रक्शन प्रा. लि. प्रकरण (४०० कोटी) पत्राचाळ घोटाळा (१०३९.७९ कोटी) यासह अनेक मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये विविध राजकीय नेते, कंपन्यांवर कारवाई सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App