ED office : मुंबईतील ED कार्यालयास भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

ED office

युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न ; इमारतीत अनेक महत्त्वाची कार्यालये


विशेष प्रतिनिधी

मुंबई: ED office देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्री उशीरा बॅलार्ड पियर येथील ED कार्यालयात आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. ईडी कार्यालयात पहाटे २:३० वाजता लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे मुंबई अग्निशमन दलाने सांगितले.ED office

ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कैसर-ए-हिंद इमारत म्हणून ओळखली जाते. सकाळीही अग्निशमन दलाचे पथक आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. इमारतीतून धूर निघताना दिसत होता. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अद्याप येऊ शकला नाही. कैसर-ए-हिंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती आणि त्याच मजल्यावर ईडीचे कार्यालय होते.



ईडी कार्यालयाव्यतिरिक्त, कैसर-ए-हिंद इमारतीत इतर अनेक सरकारी कार्यालये आहेत. पाच तासांपासून अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. इमारतीच्या वरच्या भागातून अजूनही धूर येत असल्याचे दिसून येत होते. या आगीत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Massive fire breaks out at ED office in Mumbai 12 fire engines at the spot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात