केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप नेत्यांचे सामूहिक उपोषण; दिल्लीचे मंत्री जंतरमंतरवर जमले, प्रत्युत्तरात भाजपचेही आंदोलन

AAP leaders against Kejriwal's

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी रविवारी देशभरात सामूहिक उपोषण सुरू केले. रविवारी पक्षाचे बडे नेते सकाळी उपोषणासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचले होते.Mass fast of AAP leaders against Kejriwal’s arrest; Delhi ministers gathered at Jantar Mantar



मद्य धोरण घोटाळ्यात 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांची तत्काळ सुटका करावी, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. ईडीने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले आहे. पक्षाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे- संपूर्ण देश हुकूमशाहीविरोधात एकवटला आहे. चला एकत्र येऊन देशाच्या सुपुत्रासाठी आवाज उठवूया.

यापूर्वी ‘आप’ने 26 मार्च रोजी देशभरात निदर्शने केली होती. दिल्लीतील पक्षाचे कार्यकर्तेही पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी निघाले होते, पण त्यांना पोलिसांनी वाटेत अडवले आणि ताब्यात घेतले.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाच्या नेत्यांनी ‘शराब ते शीश महल’ मोहिमेचा भाग म्हणून ‘आप’चा निषेध केला. त्यांनी केजरीवाल यांच्या घराचे मॉडेल ठेवले आणि ते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे मॉडेल असल्याचे सांगितले. याशिवाय दारूच्या बाटलीच्या कटआऊटवर संजय सिंह यांचा फोटो दाखवून पक्षाने निदर्शने केली.

Mass fast of AAP leaders against Kejriwal’s arrest; Delhi ministers gathered at Jantar Mantar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात