विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरात सीआरपीएफ कॅम्पवर 29 मार्च रोजी संध्याकाळी बुरखा घातलेल्या दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. सोशल मीडियावर या बाॅम्ब हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला एक दहशतवादी सीआरपीएफच्या कॅम्पवर बॉम्ब फेकताना दिसत आहे. Masked terrorist throws bomb at CRPF camp, escapes; Video goes viral !!
हा दहशतवादी बुरखा घालून रस्त्यावर आला. त्याने आपल्या बॅगेतून बॉम्ब काढला आणि तो सीआरपीएफ कॅम्पवर फेकला. बॉम्ब फेकल्यानंतर लगेच दहशतवाद्याने घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा दहशतवाद्याने कॅम्पवर बॉम्ब फेकला तेव्हा काही दुचाकीही तिथून जाताना दिसल्या. दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याने तेथे छोटी आग लागली. स्थानिकांनी लगेच पाणी टाकून ती विझवली. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. सुरक्षा दल दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Veiled woman hurls petrol bomb at CRPF camp in Jammu-Kashmir’s Sopore In an act caught on camera, a veiled woman was seen hurling a a petrol bomb at a CRPF camp in Sopore in Jammu and Kashmir. pic.twitter.com/K7n8qxSi7A — Ashish Singh / आशीष सिंह (@ashishrajpoot) March 29, 2022
Veiled woman hurls petrol bomb at CRPF camp in Jammu-Kashmir’s Sopore In an act caught on camera, a veiled woman was seen hurling a a petrol bomb at a CRPF camp in Sopore in Jammu and Kashmir. pic.twitter.com/K7n8qxSi7A
— Ashish Singh / आशीष सिंह (@ashishrajpoot) March 29, 2022
29 मार्च रोजी उशिरा श्रीनगरच्या रैनावरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App