जाणून घ्या, काय दिली आहे प्रतिक्रिया? Manoj Tiwaris daughter Riti Tiwari joins BJP
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार मनोज तिवारी यांची मुलगी रिती तिवारी हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी ती म्हणाली की, मी एवढ्या लवकर राजकारणात येईन असे कधीच वाटले नव्हते. मात्र मी कोणाचीही निराशा करणार नाही, अशी ग्वाहीही तिने दिली. रिती तिवारी केवळ गायिकाच नाही तर गीतकारही आहे.
भाजपचे खासदार मनोज तिवारी यांची मुलगी रिती तिवारी म्हणाली की, राजकारणात येण्याची योजना होती पण 10-15 वर्षांनंतरची योजना होती. स्वतःची ओळख करून देताना तिने सांगितले की ती एका NGO मध्ये काम करते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिती तिवारी यांनी मीडियासमोर आपली ओळख करून देताना सांगितले की, मी खासदार मनोज तिवारी यांची मुलगी आहे. मी 22 वर्षांची आहे. मी एक गायक आणि गीतकार आहे. मी एका एनजीओमध्ये काम करते आणि मला सामाजिक कार्यकर्ता बनायचे आहे.
रिती तिवारी पुढे म्हणाली की, मला आश्चर्य वाटते. हे आज किंवा इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. राजकारणात येण्याची माझी 10-15 वर्षांनंतरची योजना होती, पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माझ्यात काहीतरी पाहिले असेल. मी कोणालाही निराश करणार नाही याची काळजी घेईन.
भाजपने मनोज तिवारी यांना ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर मनोज तिवारी काँग्रेसच्या कन्हैया कुमार विरुद्ध लढत आहेत. ईशान्य दिल्लीतून काँग्रेसने कन्हैया कुमारला उमेदवारी दिली आहे. दिल्लीत लोकसभेच्या एकूण ७ जागा आहेत. २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर मतदान होणार आहे. त्याचवेळी ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App