Manoj Tiwari : मराठी मुद्द्यावरून मनोज तिवारींचा इशारा- राज ठाकरेंसोबत जाणाऱ्याचे राजकारण संपेल, मराठीची खरी काळजी भाजपलाच

Manoj Tiwari

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Manoj Tiwari मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर राज्यात रंगत असलेला वाद आता अधिकच तीव्र होत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा जोमात उचलून धरल्यानंतर, आता भाजपचे खासदार व लोकप्रिय गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो महाराष्ट्रात समाप्त होईल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला असून, मराठी अस्मितेचा खरा आदर भाजपच करत असल्याचा दावा केला आहे.Manoj Tiwari

मनोज तिवारी म्हणाले की, या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाषिक आणि प्रांतीय एकतेचा जो भाईचारा आहे, तो मोडण्याचा प्रयत्न करणारा हा एक ‘प्राणी’ आहे. राज ठाकरेला कोणीही काहीही बोलू दे, पण जे राजकारणाच्या कचराकुंडीत गेले आहेत, त्यांना पुन्हा उचलण्याचा प्रयत्न कुणी करू नये, हीच प्रार्थना.Manoj Tiwari



भाजपकडून मराठी संस्कृतीचा आदर

मनोज तिवारी म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांच्या सारखे लोक मराठी संस्कृतीचा केवळ दिखावा करतात. मात्र भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थाने मराठी भाषेच्या अस्मितेचे जतन करते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरे यांना स्वीकारत नाही. आणि जे त्यांच्या सोबत जातील, ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून संपतील.

दुबेला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे- राज ठाकरे

उत्तर भारतात येऊन दाखवा,तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे आव्हान झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले होते. त्यावर दुबेंना प्रतिआव्हान देत तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. हिंदी सक्तीचा विरोध आणि मीरा-भाईंदर येथील मनसेच्या आंदोलनानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी पेटलेत अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

राज ठाकरे म्हणाले, त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. या वेळी त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी झारखंडचा खासदार दुबे हा आम्हाला म्हणतो की, तुम्ही आमच्याकडे येऊन दाखवा, तुम्हाला पटक पटक के मारेंगे. या खासदारावर केस झाली का? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. कारण या नेत्यांना बोलतांना माहिती असते की, सरकार आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे ही अशा प्रकारची भाषा करत असतात. पण दुबे मी तुम्हाला सांगतोय की, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा. तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे.

बिहारमधील लोकाना माझं एक विचारणं आहे- 28 सप्टेंबर 2011 हिंमतनगरजवळ 14 महिन्याचा मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली . जवळपास 20 हजार लोकांना गुजरातमधून हाकलून लावले. तेव्हा तुम्हाला या घटनेच्या बातम्या दिसल्या का? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला.

Manoj Tiwari Warns Raj Thackeray: Marathi Politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात