100@ Mann Ki Baat : ‘मन की बात’ पाहा लाल किल्ला, सूर्य मंदिर, गेट वे सह 13 ठिकाणी!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युनिक उपक्रम मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे, त्यानिमित्ताने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने 3 अनोखे उपक्रम हाती घेतले आहेत. मन की बात या वैशिष्ठ्यपूर्ण कार्यक्रमाचे यश साजरे करण्यासाठी मंत्रालयाने हे उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती केंद्रीय संस्कृती सचिव गोविंद मोहन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि क्रांतिकारी उपक्रम ठरलेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या 30 एप्रिल रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे.Mann Ki Baat : Watch ‘Mann Ki Baat’ at 13 locations including Red Fort, Surya Mandir, Gateway!

मंत्रालयाच्या उपक्रमांविषयी तपशीलवार माहिती देताना गोविंद मोहन म्हणाले, की सांस्कृतिक मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण क्षण साजरा करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या स्थळांसह देशभरातील 13 महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक प्रोजेक्शन मॅपिंगचा वापर करुन सादरीकरणे केली जाणार आहेत. हा उपक्रम 29 एप्रिलपासूनच सुरु होणार आहे. प्रत्येक स्मारकाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात त्या जागेचे ऐतिहासिक तसेच वास्तुकलेसंदर्भातील महत्त्व दाखविणारे कार्यक्रम होतील. तसेच पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात चर्चिलेले विविध विषय आणि संकल्पना यांच्या धर्तीवर हे कार्यक्रम एक देश म्हणून भारतात आढळणारे वैविध्य अधोरेखित करणारे असतील.



13 महत्त्वाच्या ठिकाणी कार्यक्रम

दिल्ली येथील लाल किल्ला, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर किल्ला, ओदिशामधील कोणार्क सूर्यमंदिर, तेलंगणाचा गोवळकोंडा किल्ला, तामिळनाडूचा वेल्लोर किल्ला, महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया, झारखंडचा नवरत्नगड, उधमपूरचा रामनगर किल्ला, उत्तर प्रदेशातील रेसिडेन्सी इमारत, गुजरातचे मोढेरा सूर्य मंदिर, आसामचे रंग घर, राजस्थानचा चितोडगड किल्ला आणि नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालय.

संध्याकाळी 5.00 वाजता या कार्यक्रमासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. प्रोजेक्शन मॅपिंग शो प्रादेशिक भाषेत सादर होईल आणि आपल्या देशाचा इतिहास तसेच वारसा यांची विस्तृत माहिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल. या वेळी, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या प्रेरणेसह, स्मारकाचे ऐतिहासिक आणि वास्तुरचनेसंदर्भातील महत्त्व आणि मन की बात कार्यक्रमाची संकल्पना यावर भर दिला जाईल.

Mann Ki Baat : Watch ‘Mann Ki Baat’ at 13 locations including Red Fort, Surya Mandir, Gateway!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात