पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) सकाळी 11 वाजता आपल्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 78 व्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकवरून चर्चेला सुरुवात केली आणि महान धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी कोरोना लसीकरणाबद्दल लोकांना जागरूक केले. तसेच देशातील सर्व लोकांना त्यांच्या स्तुत्य कार्यासाठी प्रोत्साहित केले. Mann Ki Baat PM Modi Address To Nation, tribute To Milkha Singh, Talked about Corona Vaccination and Tokyo Olympic
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) सकाळी 11 वाजता आपल्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 78 व्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकवरून चर्चेला सुरुवात केली आणि महान धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी कोरोना लसीकरणाबद्दल लोकांना जागरूक केले. तसेच देशातील सर्व लोकांना त्यांच्या स्तुत्य कार्यासाठी प्रोत्साहित केले.
Tune in to #MannKiBaat June 2021. https://t.co/UZ1PonoObS — Narendra Modi (@narendramodi) June 27, 2021
Tune in to #MannKiBaat June 2021. https://t.co/UZ1PonoObS
— Narendra Modi (@narendramodi) June 27, 2021
महत्त्वाचे म्हणजे पीएम मोदी यांनी फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहून मासिक रेडिओ कार्यक्रमाची सुरुवात केली. मिल्खा सिंग यांनी देशासाठी केलेल्या योगदानाबद्दलही त्यांनी नमूद केले. पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा टोकियो ऑलिम्पिकची बातमी येते, तेव्हा मिल्खा सिंगसारख्या महान खेळाडूला कोण विसरू शकेल. काही दिवसांपूर्वी कोरोनाने त्यांना आमच्यापासून दूर नेले. ते रुग्णालयात असताना मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी म्हटलं की 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपण भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी आमचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत. त्यामुळे आपल्याला आमच्या खेळाडूंचे मनोबल वाढवावे लागेल. मिल्खासिंग खेळाबद्दल इतका समर्पित आणि उत्कट होते की, आजारपणातही त्यांनी तातडीने त्यावर सहमती दर्शविली. दुर्दैवाने नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
Mann Ki Baat PM Modi Address To Nation, tribute To Milkha Singh, Talked about Corona Vaccination and Tokyo Olympic
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more