वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तपास एजन्सी शुक्रवारी सिसोदिया यांना न्यायालयात हजर करेल, तिथे ईडी त्यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे. ईडीने गुरुवारी रात्री उशिरा सिसोदिया यांना अटक केली.Manish Sisodia’s bail hearing in court today ED will also produce Sisodia in court, arrested yesterday in money laundering case
दुसरीकडे, सीबीआय प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर राऊज अव्हेन्यू कोर्टात दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे. 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने 26 फेब्रुवारीला सिसोदिया यांना अटक केली होती. 7 दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर, न्यायालयाने 6 मार्च रोजी सिसोदिया यांना 20 मार्च (14 दिवस) पर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले.
सिसोदिया यांनी 7 मार्चला तिहारमध्ये 6 तास चौकशी केली
मद्य धोरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची चौकशी करत आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी एजन्सीने तिहार तुरुंगात सिसोदिया यांची 6 तास चौकशी केली होती. वृत्तानुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींसह ईडीची टीम तिहारमध्ये पोहोचली होती. नवीन मद्य धोरण बनवताना दक्षिण दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून 100 कोटींची लाच घेतल्याचे ईडीने सांगितले होते. याप्रकरणी ईडीने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप यांना 6 मार्च रोजी अटक केली होती. चौकशीदरम्यान या आरोपींनी सिसोदिया यांचे नाव घेतले होते.
तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या कन्येलाही ईडीचे समन्स
ED ने तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आमदार कविता यांना 11 मार्च रोजी दिल्ली मद्य धोरण प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने यापूर्वी कविता यांना 9 मार्चला समन्स बजावले होते. यावर कविता यांनी एजन्सीकडे आठवड्याची मुदत मागितली होती.
दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं कविता यांनी म्हटलं होतं. भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या कविता यांची विनंती स्वीकारून ईडीने त्यांना नव्याने समन्स बजावले आहे. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी सीबीआयने कविता यांची हैदराबादमध्ये सुमारे 7 तास चौकशी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App