Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; गोळीबारात ९ जण ठार, अनेक जखमी

शांततेच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे

विशेष प्रतिनिधी

इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शांततेच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खमेनलोक भागात झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. Manipur Violence Violence erupted again in Manipur 9 killed in firing many injured

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मंगळवारी (13 जून) दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांना समाजकंटकांनी आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंगमध्येही अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

इंफाळ पूर्वेचे पोलिस आयुक्त शिवकांत सिंह यांनी सांगितले की, खामेनलोक भागात उसळलेल्या हिंसाचारात नऊ जण ठार आणि दहाजण जखमी झाले. मृतांच्या शवविच्छेदनाची कारवाई करण्यात येत आहे. त्याचवेळी, एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अनेक जखमींना उपचारासाठी इंफाळला नेण्यात आले आहे.

हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या आहेत. मणिपूरमधील हिंसाचारामुळे राज्यातील शांतता प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणावरून मेईतेई आणि कुकी समाजामध्ये संघर्ष झाला होता. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा एक दिवस आधी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. खामेनलोक परिसरात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते.

Manipur Violence Violence erupted again in Manipur 9 killed in firing many injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात