Manipur Tragedy : मणिपूर- बॉम्ब हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू, आई जखमी; घटनेच्या निषेधार्थ निदर्शने; पोलीस चौकी तोडली, दोन तेल टँकर पेटवले

Manipur Tragedy

वृत्तसंस्था

इंफाळ : Manipur Tragedy मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात काही अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा दोन मुले आणि त्यांची आई त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. आई जखमी झाली आहे.Manipur Tragedy

स्थानिक लोकांनी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी आंदोलन केले. परिसरात एका पेट्रोल पंपाजवळ दोन ऑइल टँकर आणि एका ट्रकला आग लावली. त्यांनी मोइरांग पोलीस ठाण्यासमोर टायर जाळले आणि एक पोलीस चौकी तोडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.Manipur Tragedy



मंगळवारी सकाळी मोइरांगमध्ये तणाव वाढला. संतप्त तरुण आणि महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर टायर जाळून रस्ता रोखून धरला. एका पेट्रोल पंपाजवळ तेलाचे २ टँकर आणि एका ट्रकलाही आग लावली. नागरिकांनी ट्रोंग्लाओबी येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला. राज्याचे गृहमंत्री गोविंददास कोंथौजम यांनी सांगितले की, संतप्त जमावाने कॅम्पमधील अनेक गाड्या जाळल्या आणि तोडफोड केली.

प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला, ज्यामध्ये २ आंदोलकांचा मृत्यू झाला आणि २५ जण जखमी झाले. सरकारने खोऱ्यातील ४ जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंग यांनी दोन मुलांच्या मृत्यूच्या घटनेची चौकशी ‘एनआयए’मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जिल्ह्यांत ३ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसेनंतर आतापर्यंत २६० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत.
आईसोबत झोपले होते दोन्ही चिमुकले

रॉकेट हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे वडील बिहारमध्ये तैनात आहेत. गावात ही मुले आई आणि आजोबांसोबत राहत होती. आजोबांनी सांगितले की, गेल्या २ दिवसांपासून गोळीबार सुरू होता, त्यामुळे कुटुंब दहशतीखाली होते. सून आणि मुले झोपलीच होती. त्यानंतर ५-७ मिनिटांतच रॉकेटने बेडरूमची भिंत तोडली. दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.

Manipur Tragedy: 2 Children Killed in Bishnupur Bomb Attack; NIA to Probe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात