विशेष प्रतिनिधी
सिकंदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत मंदा कृष्ण मडिगा सहभागी झाले आणि त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडले. आपले संपूर्ण जीवन दलित उत्थानासाठी आणि मडिगा आरक्षणासाठी व्यतित करणारे मंदा कृष्ण मडिगा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला धाकटा भाऊ मानतात. दोघांच्यात पॉलिटिकल केमिस्ट्री पेक्षा इमोशनल केमिस्ट्री अधिक आहे. त्याचाच प्रत्यय आजच्या मोदींच्या रॅलीत आला. Manda Krishna Madiga wept with her head on Modi’s shoulder
तेलंगण विधानसभा प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी सिकंदराबाद मध्ये रॅली घेतली. त्या रॅलीला भाजपने मंदा कृष्ण मडिगा यांना खास निमंत्रण दिले होते. त्यांची खुर्ची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी ठेवली होती. रॅली दरम्यान दोघांमध्ये काही संभाषण देखील झाले आणि काही क्षण मंदा कृष्ण मडिगा भावूक झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर डोके ठेवले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सावरत त्यांना धीर दिला. या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यामुळे मंदा कृष्ण मडिगा नेमके आहेत कोण??, याविषयी संपूर्ण देशभरात उत्सुकता निर्माण झाली.
मडिगा आरक्षणाचे अध्वर्यू
मंदा कृष्ण मडिगा तेलंगणा मधले दलित चळवळीतले एक प्रमुख कार्यकर्ते आहेत 1980 च्या दशकात त्यांचा काही काळ नक्षलवाद्यांची देखील संपर्क आला होता. परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक नक्षलवादी चळवळीपासून स्वतःला अलग ठेवत दलित हक्कांची चळवळ पुढे नेली. काही वर्षांनी त्यांनी मडिगा आरक्षण समिती स्थापन केली आणि मडिगा हे नाव स्वतःला घेतले. तेव्हापासून आजपर्यंत मंदा कृष्ण मडिगा हे मडिगा आरक्षणासाठी तेलंगणात लढा देत आहेत. दलित उत्थानासाठी त्यांनी जीवन व्यतीत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे अधिकार भेट झाली होती दोघांमध्ये काही संवाद झाला होता. त्यावेळीच मोदींनी त्यांना धाकटा भाऊ असे संबोधले होते. आज जेव्हा सिकंदराबादच्या रॅलीत मंदा कृष्ण मडिगा आले, तेव्हा मोदींनी त्यांचे हात धरून स्वागत स्वीकारले. त्यांच्याशी संवाद साधला. मंदा कृष्ण मडिगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाविषयी काही सांगितले. काही काळ मंदा कृष्ण मडिगा भावूक झाले आणि त्यांनी मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून आशीर्वाद आहे त्यावेळी मोदींनी त्यांना धीर दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App