विशेष प्रतिनिधी
कोलकता : प. बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अखेर तीन जाहीर सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. वाढत्या कोरोनामुळे निवडणूक आयोगाने मोठ्या जाहीर प्रचारसभा घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ममतादिदींची अखर पंचाईत झाली असून त्यांच्या प्रचाराच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. Mamta cancelled poll railles after Election commissions directions
राज्यात कोरोना वाढल्याने जाहीर सभा घेणार नाही असे दोन दिवसांआधी ममतादीदींनी मोठ्या तारस्वरात सांगितले होते. मात्र आपलाच शब्द फरवत त्यांनी काल तीन जाहीर सभा घेतल्या होत्या. त्याला मोठी गर्दीही झाली हती. त्यामुळे त्यांच्या कथनी व करनीतील फरक स्पष्ट जाणवला होता. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सर्व सभा रद्द करण्याची घोषणा कालच केली होती.
ही आयती संधी मानत दीदी मात्र आपल्या साऱ्या सभा घेणार होत्या. कोरोनाच्या नावाखाली भाजपच्या सभांवर टीका करायची आणि स्वतः मात्र सभा घ्यायचा असा त्यांचा मनसुबा होता. त्यामुळे काल रात्री त्यानी सभांचा कार्यक्रम जाहीरही केला होता. मात्र निवडणूक आयोगानेच आता जाहीर सभांवर बंदी घातल्याने मोठ्या सभा रद्द करण्याशिवाय दीदींपुढे पर्याय राहलेला नाही.
राज्यात आता शेवटच्या टप्प्याचे मतदान बाकी असून दोन मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App