बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!

भारतातला पश्चिम बंगाल आणि विद्यमान बांगलादेश यात फरक नाही उरला, पश्चिम बंगाल निर्मितीचा हेतूच ममता बॅनर्जींनी उद्ध्वस्त केला!!, नेमके हेच चित्र पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात घडलेल्या हिंदू समाजावरील अत्याचाराच्या निमित्ताने समोर आले. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यात एकाच वेळी हिंदू समाजाला “सिलेक्टिवली टार्गेट” केले गेले. हे समजण्यासाठी कुठल्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही, तर दोन्ही ठिकाणच्या विद्यमान राज्यकर्त्यांच्या विशिष्ट मानसिकतेची नेमकी ओळख पटवून घेण्याची गरज आहे. त्यातही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजवटीची नेमकी मानसिकता समजून घेणे अधिक आवश्यक आहे. Mamatha Banerjee

कारण ममता बॅनर्जींनी आपल्या लढ्याची सुरुवात कम्युनिस्टांच्या विरोधात सुरू केली, पण तो लढा आता थेट हिंदू समाजाच्या विरोधात आणून ठेवला. आणि भाजपशी लढण्याचे निमित्त करून ममता बॅनर्जींनी बंगाली हिंदू समाजालाच आपले शत्रू मानले. दंगलीत घरेदारे, दुकाने जाळून, हिंदूंच्या हत्या करून संपूर्ण हिंदू समाजाला टार्गेट करणाऱ्या कट्टरपंथी इस्लामिस्ट समाजकंटकांना अभय दिले.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या लोकनियुक्त सरकारला हटविण्यासाठी विद्यार्थी आंदोलनाच्या आडून कट्टरपंथी जिहादी इस्लामिस्टांनी हिंदू समाजाचे शिरकाण केले. शेख हसीना बांगलादेशातून परागंदा झाल्या तरी इस्लामिस्टांनी आंदोलनाच्या नावाखाली सुरू केलेला हिंसाचार थांबवला नाही, तर तो उलट वाढवून अधिक तीव्र केला. त्यातून बांगलादेशातील हिंदू समाजाच्या शिरकाणाचे कारस्थान अंमलात आणले. त्याला नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांनी साथ दिली, तर त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये बांगलादेश सीमावर्ती भागात मुर्शिदाबाद, जांगीपुर जिल्ह्यांमध्ये हिंदूंवरच हल्ले करण्यात आले. यातली “मोडस ऑपरेंडी” पूर्णपणे समान राहिली. तिच्या दोन्ही ठिकाणी तसूभरही फरक दिसला नाही.
याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपल्या राजवटीच्या काळात पश्चिम बंगालच्या निर्मितीचा हेतूच उद्ध्वस्त करून टाकला.



कारण मूळात भारताच्या फाळणीच्या वेळी मोहम्मद अली जीना यांना संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल पाकिस्तान मध्ये सामील करून घ्यायचे होते. बंगालमध्ये सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बहुल भागाला पाकिस्तानात सामील करण्याच्या विरोधात मोठा उभा करण्यात आला. त्यामुळे भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी इंग्रज आणि भारतीय राज्यकर्त्यांना बंगालची फाळणी करून पश्चिम बंगालची निर्मिती करावी लागली होती. बहुसंख्य मुस्लिम असलेला पूर्व बंगाल पाकिस्तानचा भाग झाला आणि बहुसंख्य हिंदू असलेल्या पश्चिम बंगाल भारतात समाविष्ट झाला. हिंदू समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पश्चिम बंगाल राज्याची निर्मिती झाली होती. त्या निर्मितीत श्यामाप्रसाद मुखर्जींचा सिंहाचा वाटा होता.

– ममतांचे पाप

अगदी कम्युनिस्टांच्या दीर्घ राजवटीत देखील पश्चिम बंगालच्या राज्यकर्त्यांच्या मनात आजच्या एवढा हिंदू द्वेष भरला नव्हता. तो हिंदू द्वेष ममता बॅनर्जींच्या राजवटीत राज्यकर्त्यांमध्ये भरला. म्हणूनच बांगलादेशाला चिकटून असलेले पश्चिम बंगाल मधले जिल्हे हळूहळू मुस्लिम बहुल होत गेले. बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची प्रचंड घुसखोरी झाली. ममता बॅनर्जींनी त्यातूनच आपली vote bank पक्की केली. पण यामध्ये पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतू उद्ध्वस्त झाला. कारण मुस्लिम बहुल प्रांत म्हणून आधीच पूर्व बंगाल पाकिस्तानात सामील झाला होता आणि उरलेला हिंदू बहूल भाग पश्चिम बंगाल राज्य म्हणून अस्तित्वात आणला होता. आज पश्चिम बंगाल मधल्या बांगलादेशाला चिकटून असलेल्या ७ सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची संख्या प्रचंड वाढली आहे. किंबहुना बांगलादेश आणि पश्चिम बंगाल यांची सीमा तांत्रिकदृष्ट्या अस्तित्वात असून ती सामाजिक दृष्ट्या जवळपास पुसली गेली आहे. ममता बॅनर्जींच्या राजवटीचे हे “पाप”संपूर्ण हिंदू समाजाला भोवले आहे.

Mamatha Banerjee destroyed the cause of West Bengal creation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात