काल राहुल म्हणाले, “मी हिंदू”; आज ममता म्हणाल्या, “TMC म्हणजे टेम्पल – मशीद – चर्च पार्टी!!”


वृत्तसंस्था

पणजी : देशाचे संपूर्ण राजकारण आता हिंदुत्व या विषयाभोवती फिरायला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे राजकीय नेते धार्मिक – राजकीय विषयांमध्ये रंगले आहेत.Mamata says, TMC means Temple – Masjid – Church parfy

काल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जयपूरच्या सभेत,” होय मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही”, असे म्हणून घेतले आहे, तर आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची व्याख्याच बदलून टाकली आहे.वास्तविक पाहता तृणमूल या शब्दाचा अर्थ जमिनीशी जोडलेली काँग्रेस परंतु त्यांनी TMC या अक्षरांची फोड करून T म्हणजे टेम्पल, M म्हणजे मशीद तर C म्हणजे चर्च…!! अशी तृणमूल काँग्रेसची नवीन व्याख्या केली आहे.

ममता बॅनर्जी गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तिथली ख्रिश्चन मतांची टक्केवारी लक्षात घेता त्यांनी C म्हणज् चर्च अशी जोडणी त्याला दिली आहे. आता खुद्द ममता बॅनर्जी यांनीच टेम्पल – मशीद आणि चर्च अशी फोड केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या शब्दाचा मूळ अर्थच निघून गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशी विश्वनाथ कॉरिडोरचे उद्घाटन केले आहे. पुढचा महिनाभर देशभरातले विविध कार्यक्रम काशीमध्ये होणार आहेत. त्याला अर्थातच हिंदुत्वाचा भगवा रंग आहे. अशा वेळी मोदी विरोधक राहुल गांधी यांनी हिंदुत्व आणि हिंदू या दोन शब्दांमध्ये कसा भेद आहे हे जयपूरमध्ये स्पष्ट केले आहे,

तर ममता ममता बॅनर्जी यांनी आपण कशा धर्मनिरपेक्ष आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्या पक्षाच्या नावाचा अर्थच बदलून टाकला आहे. त्यामध्ये त्यांनी टेम्पल – मशीद आणि चर्च आणून सर्वधर्म स्वभावाचा “नवीन धडा” पक्षाच्या इतिहासात जोडला आहे…!!

Mamata says, TMC means Temple – Masjid – Church parfy

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*