नाशिक – देशात मोदी विरोधी वातावरण तयार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा विरोधी ऐक्यासाठी उचल खाल्ली… राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शरद पवारांना यूपीए चेअरमन करण्याचा ठराव पास केला… त्याचा राजकीय मुहूर्त साधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका ओळीचे ट्विट करून दोन्ही बड्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले… 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणार…!!Mamata – Pawar – Rahul: Mamata – Pawar’s “political leap” Congress foul in one fell swoop
काँग्रेस या खऱ्याखुऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या राजकारणाची ही खास स्टाईलच आहे… प्रादेशिक नेत्यांनी कितीही “उंच उडी” मारली, कितीही मोठी महत्त्वाकांक्षा दाखविली…, तरी काँग्रेस त्यांना प्रत्युत्तर देणार ती पक्षाच्या प्रादेशिक नेत्याच्या तोंडूनच… आजही नेमक्या याच स्टाईलने काँग्रेसने ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या “राजकीय उड्यांना” प्रत्युत्तर देत खाली आणले आहे…!!
ममतांनी बिगरभाजप आणि बिगर भाजप शासित राज्यांच्या पत्र लिहून ऐक्याची हाक दिली. शरद पवारांना यूपीए चेअरमन करण्याचा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. या ठरावाला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अनुकूल प्रतिसाद दिला… पण ममता आणि पवार या दोन बड्या नेत्यांच्या या राजकीय हालचालींना प्रत्युत्तर कोणी दिले, तर नाना पटोले यांनी…!! म्हणजे महाराष्ट्र प्रदेश पातळीवरच्या नेत्याने… ममता बॅनर्जी यांना पत्रावरून सवाल कोणी केले, तर खासदार अधीर रंजन चौधरी यांनी…!! म्हणजे बंगाल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनीच…!! याला म्हणतात, काँग्रेसचे राष्ट्रीय राजकारण…!!
ममता किंवा पवार यांच्या सारख्या बड्या नेत्यांच्या “राजकीय उंच उड्यांची” दखलही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने घेतली नाही. काँग्रेस हायकमांडने तर दखल घ्यायचे सोडाच… पण काँग्रेसच्या के. सी. वेणूगोपाल या सरचिटणीसांनी किंवा काँग्रेस कार्यकारिणीच्या कोणा सदस्यानेही ममता आणि पवारांच्या “राजकीय उंच उड्यांना” प्रत्युत्तर देण्या इतपत महत्त्व दिले नाही…!!
नाना पटोले यांनी एका वाक्यात ट्विट केले… राहुल गांधी हे द्रष्टे नेते आहेत. ते २०२४ मध्ये पंतप्रधान होतील…!! नंतर पत्रकारांनी या ट्विटवर खुलासा विचारल्यावर नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या द्रष्टेपणाची उदाहरणे दिली. राहुल गांधींनी कोरोना महामारीचा आणि आर्थिक संकटाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. पण मोदी सरकारने ऐकले नाही. देश संकटात लोटला. पण 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होऊन देशाला सावरतील, असे नाना पटोले म्हणाले… नानांच्या एका ट्विटमधून आणि त्यांच्या छोट्या उत्तरातून काँग्रेसने ममता आणि पवारांच्या “राजकीय उंच उडीला” एका झटक्यात “खाली” आणले आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App