Mamata Banerjee new political move : राजकीय रणनीतीकार पद सोडणाऱ्या प्रशांत किशोर यांना घेऊन ममता बॅनर्जी पोहोचल्या कालीघाट मंदिरात

वृत्तसंस्था

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी नमाज पठण, विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान मंदिर दर्शन, चंडीपाठ पठण, निवडणूक विजयानंतर तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिरव्या गुलालाची उधळण आणि सायंकाळी पत्रकार परिषदेनंतर कालीघाट मंदिरात दर्शन… Mamata Banerjee`s new political move; went to kalighat mandir with prashant kishor

दिवसभराच्या राजकीय घडामोडींचा केंद्र बिंदू राहिलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आजचा हा सायंकाळचा कार्यक्रम होता. सायंकाळी ६.०० वाजता पत्रकार परिषदेला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी या आपले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना घेऊन कालीघाट मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचल्या.

या वेळी त्यांच्या समवेत काही समर्थक होते पण त्यांचा फार मोठा ताफा नव्हता. प्रशांत किशोर हे काळ्या टी शर्टमध्ये त्यांच्या समवेत आलेले दिसले. कालीघाट मंदिर परिसरात आधीच असलेल्या काही भाविकांकडे पाहून ममता बॅनर्जी यांनी व्ही फॉर व्हिक्टरीची खूण केली आणि त्या कालीमातेच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या. काही वेळ तेथे थांबून दर्शन घेऊन त्या तेथून लगेच निघूनही गेल्या.

ममता बॅनर्जी यांनी निवडणूकीपूर्वी मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतदानावर लक्ष केंद्रीत करून त्यांना भरपूर सवलती दिल्या. त्यांच्यावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप झाल्यानंतर त्यांनी मंदिर दर्शन, चंडीपाठ करण्याचा सपाटाही लावला. विधानसभेत विजय मिळविल्यानंतर तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रंग दाखविला. विजयाच्या बातम्या जशा येऊ लागल्या तसा कार्यकर्त्यांनी कोलकाता आणि अन्य शहरांमध्ये रस्त्यावर येऊन जल्लोषात हिरवा गुलाला उधळला. निवडणूक आयोगाने लेखी तंबी देऊनही जल्लोष आणि हिरव्या गुलालाची उधळण थांबली नव्हती.

तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांनी आरमबाग, बेलाघाट, शिवपूर, दुर्गापूर, उत्तर वर्धमान या शहरांमध्ये भाजपच्या कार्यालयांवर हल्ले करून पेटवा पेटवी केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. कोलकात्यात तृणमूळच्या कार्यकर्त्यांनी हेस्टिंग्ज येथे प्रदेश भाजपच्या मुख्यालयाजवळ जमून घोषणाबाजी केली.

एकीकडे हिरवा गुलाल आणि हिंसाचार सुरू असताना ममता बॅनर्जींनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना घेऊन कालीघाट मंदिरात कालीमातेचे दर्शन घेतले. यातून त्यांनी आपली “धर्मनिरपेक्षता” सिध्द केली.

Mamata Banerjee`s new political move; went to kalighat mandir with prashant kishor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात