ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर राज्यात आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!

नाशिक : ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!, असले राजकारण पश्चिम बंगाल मध्ये घडले. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेल्या बंगाल फाइल्स सिनेमाचा उद्या प्रारंभ होत आहे. देशात आणि परदेशात तो सिनेमा रिलीज होत आहे. कोलकत्ता हत्याकांडावर आधारित असलेला हा सिनेमा पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होऊ नये यासाठी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने आकाश पाताळ एक केले आहे. Mamata banerjee

पश्चिम बंगाल मध्ये मुस्लिम लीगने कशाप्रकारे हिंदू हत्याकांड घडविले त्यावेळी कोणता घटनाक्रम घडला होता हिंदूंच्या हत्याकांडाचा कुणी आणि कसा बदला घेतला होता, याचे वर्णन करणारा हा सिनेमा असल्याचे मानले जात आहे. या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बरीच आदळापट केली होती.

– अधिकृत बंदी नाही, पण…

आता उद्या पाच सप्टेंबर रोजी देशभर आणि परदेशात द बंगाल फाईल्स हा सिनेमा रिलीज होण्याच्या बेतात असताना पश्चिम बंगाल मधल्या थिएटर्सनी तो सिनेमा रिलीज करायला नकार दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने त्या सिनेमावर अधिकृतपणे बंदी घातलेली नाही, पण थिएटर मालकांना मात्र वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणून बंगाल फाईल्स आपल्या थिएटरमध्ये लावू नये, यासाठी धमकावण्यात आले असे बोलले जात आहे.



– आणीबाणीतील चित्रपट बंदी

ममता बॅनर्जी यांची ही वर्तणूक आणीबाणीतल्या काळातल्या इंदिरा गांधी यांच्या सारखीच असल्याचे दिसून आले‌. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्यापूर्वी “आंधी” हा गुलजार यांचा सिनेमा रिलीज झाला होता तो 24 आठवडे वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये नीट चालला होता, पण तो सिनेमा इंदिरा गांधींच्या राजकीय आयुष्यावर बेतलेला आहे, हे पाहताच इंदिरा गांधींनी आणीबाणी सुरू होताच 25 जून नंतर “आंधी” सिनेमावर बंदी आणली होती. तो सिनेमा मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवायलाही प्रतिबंध केला होता. “आंधी” सिनेमा बरोबरच “किस्सा कुर्सी का” आणि “नसबंदी” या दोन सिनेमांवर देखील इंदिरा गांधींच्या सरकारने बंदी घातली होती. हे सिनेमे तयार झाल्यानंतर दोन वर्षे तसेच खोक्यांमध्ये पडून होते. त्यापैकी “किस्सा कुर्सी का” सिनेमाची रिळे जाळून टाकल्याबद्दल संजय गांधी यांच्यावर खटला दाखल झाला होता. “आंधी”, “किस्सा कुर्सी का” आणि “नसबंदी” या सिनेमांमधून इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारची बदनामी करण्याचा हेतू आहे, असा आरोप इंदिरा गांधींच्या समर्थकांनी केला होता. पण आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर हे तिन्ही सिनेमे जनता पक्षाच्या राजवटीच्या काळात रिलीज झाले होते.

– बंगाल फाइल्स मधले राजकीय सत्य

बंगाल फाइल्स मधून दाखविण्यात आलेले राजकीय सत्य ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसला राजकीय धोका उत्पन्न करणारे वाटते आहे. पण सेन्सर बोर्डाने मान्यता दिलेल्या सिनेमावर राज्य सरकार अधिकृत बंदी घालू शकत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगाल फाइल्स सिनेमावर अघोषित बंदी घातली पश्चिम बंगाल मधल्या विशेषता कोलकत्या मधल्या थिएटर्स मालकांना अशाप्रकारे दमबाजी केली, की त्यांनी बंगाल फाईल्स हा सिनेमा थिएटर्स मध्ये लावायलाच नकार दिला.

– राष्ट्रपतींना पत्र

बंगाल फाइल्स सिनेमाचे निर्माते विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकार मधल्या घटकांची वेगवेगळ्या मार्गांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण तो संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे पल्लवी जोशी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून बंगाल फाईल्स हा सिनेमा पश्चिम बंगालमध्ये रिलीज करण्यासाठी मदत करायची विनंती केली. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी स्वतः बंगाल फाईल्स हा सिनेमा बघावा आणि नंतर त्यासंदर्भात निर्णय घ्यावा असे आवाहन पल्लवी जोशी यांनी केले. किंबहुना राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचे पाऊल त्यांना उचलावे लागले. एवढे करूनही ममतांच्या सरकारने बंगाल फाईल्स वरची आपली वक्रदृष्टी बाजूला हटवलेली दिसत नाही.

Mamata banerjee undeclared bans the Bengal files cinema in west bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात