वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी दिल्लीला आलेल्या आहेत. त्या पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्या दिल्लीच्या दौऱ्यावर आलेली आहेत.त्या आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊ शकतात. Mamata Banerjee to meet opposition leaders during her 5-day visit to Delhi
याशिवाय त्या काँग्रेसच्या तीन नेत्यांनाही भेटणार आहेत.तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही फक्त सुरवात आहे.येत्या तीन दिवसात ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना देखील भेटणार आहेत. त्यांच्या भेटीचा दिवस आणि वेळ अद्याप कळलेली नाही.
ममता बॅनर्जी च्या कार्यक्रमानुसार त्या सायंकाळी 4 वाजता प्रधानमंत्रीची भेट घेतील. त्या आधी दुपारी 2 वाजता काँग्रेस नेते कमलनाथ यांना भेटणार असून 3 वाजता काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी भेट घेतील. यानंतर सायंकाळी 6 वाजता त्या काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांची भेट घेणार आहेत.
या दौऱ्याला लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी मानलं जातं आहे.केंद्राचा पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामुळे ममता बॅनर्जी सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटून महाआघाडी तयार करत असल्याचं बोललं जातं आहे.महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी चे राजकीय सल्लाकार प्रशांत किशोर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी चा हा दौरा. याशिवाय सूत्रांची माहिती आहे की उद्या ममता बॅनर्जी शरद पवार यांची देखील भेट घेतील. यामुळे हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या रणाची सुरवातच म्हणावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App