वृत्तसंस्था
कोलकाता : Mamata Banerjee भाजपशासित राज्यांत बंगाली भाषिक लोकांचा छळ होत आहे. त्याच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जोरदार मोर्चा काढला. कोलकाता येथे मोर्चाला त्यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, बंगाली समाजाविषयी भाजपचे वर्तन पाहून मला लाज वाटते आणि निराशाही वाटली. मी आता जास्त बांगला बोलण्याचे ठरवले. हिंमत असल्यास मलाही डिटेन्शन सेंटरमध्ये टाकावे, असे आव्हान त्यांनी दिले.Mamata Banerjee
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी बंगालच्या दुर्गापूरचा दौरा करणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला ममतांनी हा मोर्चा काढला. शिवाय पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणूकही होऊ घातली आहे. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले, कायदेशीर कागदपत्रे असूनही दिल्लीच्या जयहिंद कॉलनीत बंगाली भाषिकांना बेकायदा ठरवले. महाराष्ट्रात मतुआ समुदायातील ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. हा सगळा बंगालींना दुय्यम लेखण्याचा प्रकार आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत बंगालीचा सातवा क्रमांक लागतो.Mamata Banerjee
सुवेंदू अधिकारी : बंगाली अस्मितेचा नावाला मुद्दा, घुसखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
विरोधी नेते सुवेंदू अधिकारी यांनी या रॅलीवर टीका केली. ते म्हणाले, ‘बंगाली अस्मिता’ हा मुद्दा म्हणजे बेकायदा घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी ममता यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. हजारो बंगाली शिक्षकांना सरकारी घोटाळ्यामुळे नोकरीवरून काढले गेले. त्यांचा आवाज ममतांबॅनर्जी यांनी का ऐकला नाही?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले, माझ्या वक्तव्यांचा तृणमूल विपर्यास करत आहे. यामागे घुसखोरांचा बचाव करणे हा उद्देश आहे. आम्ही घुसखोरीविरोधी आहोत.
ममता बॅनर्जी : २२ लाख बंगाली देशभर कार्यरत , या समाजाकडे संशयाने पाहतात
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या- पश्चिम बंगालचे २२ लाख स्थलांतरित मजूर देशाच्या विविध भागात रोजगार करतात. त्यांच्याकडे सर्व वैध कागदपत्रे आहेत. तरीही त्यांच्याकडे संशयातून पाहिले जाते.
मुख्यमंत्री म्हणाल्या, बंगाली भाषिक स्थलांतरित रोहिंग्या मुस्लिम असल्याचे सिद्ध करून दाखवावे. हे माझे आव्हान आहे. हा केवळ बंगालींना बदनाम करण्याचा डाव आहे. बंगाली लोकांच्या विरोधीतील या वागणुकीला कदापिही सहन केले जाणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App