ममता बॅनर्जी विमान अपघातातून बचावल्या की पुन्हा एकदा आरोपांची नवटंकी

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण विमान अपघातातून थोडक्यात बचावल्याचा दावा केला आहे. मात्र, दोन दिवसांनंतर त्यांनी या घटनेची माहिती दिल्याने खरोखरच अपघातातून बचावल्या की केंद्र सरकारवर आरोपांची नवटंकी आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.Mamata Banerjee escapes plane crash, or once again the novelty of the allegations

दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेबाबत ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली. त्यांच्या विमानासमोर अचानक दुसरे विमान आले होते. परंतु, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानांची टक्कर टळल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी बंगाल सरकारने डीजीसीएकडून अहवाल मागितला आहे.



शुक्रवारी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसाठी प्रचार केल्यानंतर परतताना ही घटना घडल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या विधानसभेबाहेर त्यांनी सांगितले, की अचानक आमच्या विमानासमोर एक विमान आले होते. वैमानिकाने आणखी १० सेकंद विलंब केला असता तर टक्कर झाली असती.

विमान सहा हजार फूट खाली आले. त्यामुळे माझी पाठ आणि छातीला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने याप्रकरणी डीजीसीएला अहवाला मागितला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या मागार्ला परवानगी देण्यात आली होती का, याबाबतही विचारणा केली आहे.

Mamata Banerjee escapes plane crash, or once again the novelty of the allegations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात