23 जणांच्या काँग्रेस वर्किंग कमिटी ऐवजी मल्लिकार्जुन खर्गेंची 47 जणांची नवी समिती, पण थरुरांचा पत्ता कट

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच खर्गे यांनी काँग्रेस कार्यकारणी अर्थात काँग्रेस वर्किंग कमिटी संपुष्टात आणली असून एका नव्या समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये एकूण 47 जणांचा समावेश असून त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, ए. के. अँटनी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मात्र शशी थरूर यांना या समितीमध्ये स्थान दिलेले नाही. Mallikarjun Khargen’s new 47-member committee instead of 23-member

मल्लिकार्जुन खर्गे हे गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नेमणूक करतील अथवा वर्किंग कमिटी सदस्यांची रिचार्ज निवडणूक होईल अशाही बातम्या आहेत. पण सध्या तरी मल्लिकार्जुन खर्गे यांनी 47 जणांची समिती नेमून काँग्रेसचे संचालन सुरू केले आहे.


मल्लिकार्जुन खर्गे आज पाडवा मुहूर्तावर घेणार सूत्रे; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा पहिला निर्णय अपेक्षित


काँग्रेसची नवीन समिती

सोनिया गांधी अध्यक्ष पदावरून दूर होतात काँग्रेस कमी वर्किंग कमिटी आपोआपच बरखास्त झाली. नव्या अध्यक्षांचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये एकूण 23 जणांचा समावेश होता. पण खर्गे यांनी तयार केलेल्या समितीत 47 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या घटनेचा विचार करुन खर्गे यांनी या नव्या समितीची स्थापना केली आहे. काँग्रेसच्या घटनेतील कलम XV (b) नुसार ही समिती स्थापन करण्यात आल्याचे काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. ही समिती आता काँग्रेस वर्किंग कमिटीच्या जागी काम करणार आहे.

यांचा आहे समावेश

या समितीमध्ये काँग्रेसमधील अनेक मोठ्या चेह-यांना स्थान देण्यात आले आहे. या समितीत अभिषेक मनू सिंघवी,आनंद शर्मा,रणदीप सुरजेवाला,अजय माकन,दिग्विजय सिंह,अंबिका सोनी,हरिष रावत,जयराम रमेश,के. सी. वेणुगोपाल,मीरा कुमार, पी. एल. पुनिया, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शिद, राजीव शुक्ला यांना स्थान दिले आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील खर्गेंचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांना मात्र या समितीतून वगळण्यात आले आहे. अर्थात शशी थरूर हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य देखील नव्हते.

Mallikarjun Khargen’s new 47-member committee instead of 23-member

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात