मल्लिकार्जुन खर्गे आज पाडवा मुहूर्तावर घेणार सूत्रे; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा पहिला निर्णय अपेक्षित

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आज 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आज काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठकही राजधानी दिल्लीत अपेक्षित आहे आणि त्या बैठकीत कदाचित मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. Mallikarjun Kharge will take over as Congress president.

खर्गे यांच्या पदग्रहणासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून 1500 कलाकारांना निमंत्रण दिले आहे. यापैकी 100 कलाकार परदेशातून येणार आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे दुसरे नेते खासदार शशी थरूर यांचा पराभव करून काँग्रेस अध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. डी. संजीवैय्या यांच्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होणारे मल्लिकार्जुन खर्गे हे दुसरे दलित नेते असतील. मल्लिकार्जुन खर्गे यांना गांधी परिवाराचा सुप्त पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच फार मोठ्या फरकाने ते काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवू शकले, अशीही चर्चा आहे.



मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात एक बैठक होणार असून या बैठकीत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार असून त्यामध्ये कदाचित मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार असताना काँग्रेस महाविकास आघाडीत सामील झाली होती. आजही काँग्रेस औपचारिक रित्या महाविकास आघाडीतच सामील आहे. पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपले बळ स्वतंत्रपणे आजमावण्याचा काँग्रेस निर्णय घेऊ शकते, अशी मुंबईतल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हाच पहिला निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mallikarjun Kharge will take over as Congress president.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात