विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जसा जवळ येतो आहे तसतसे देशातले आणि परदेशातले वातावरण सुद्धा राममय झाले आहे. हजारो सेलिब्रिटी आणि कोट्यावधी जनता वेगवेगळ्या राम उपक्रमांमध्ये मग्न आहे. Malayalam singer Chitra trolls social media for urging her to sing Ram Bhajan
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात मल्याळम गायिका के. एस. चित्रा यांनी जनतेला श्रीराम जय राम जय जय राम हे राम भजन गायला गाण्याचे आवाहन केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे कम्युनिस्ट राजवट असलेल्या केरळ मधून चित्रा ट्रोल झाल्या. सोशल मीडियातून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा अधिकार आहे, तसाच इतरांनाही तो अधिकार आहे, असे काहींनी त्यांना सुनावले. त्यामुळे चित्रा दुखावल्या गेल्या. पण त्याचवेळी लाखो रामभक्तांनी चित्रा यांचे आवाहन उचलून धरले. राम भजन गाण्याच्या आवाहनाला त्यांनी सोशल मीडिया वरून जबरदस्त प्रतिसाद दिला.
गेली 44 वर्षे गायन क्षेत्रात असलेल्या चित्रा यांनी सातत्याने फक्त आपल्या कामावरच निष्ठा ठेवली. त्या कधीही कोणत्या वादात स्वतःहून अडकल्या नाहीत. त्यामुळे राम भजन गाण्याचे आवाहन केल्यानंतर त्या सोशल मीडिया ट्रोल झाल्यानंतर त्या खूप दुखावल्या होत्या. तसे दुखावणे स्वाभाविक होते. परंतु, त्यांना अनेकांनी सपोर्टही केला, अशी माहिती चित्रा यांचे सहगायक वेणुगोपाल यांनी दिली. केरळ मधले काँग्रेस नेते व्ही. एस. सतीश यांनी देखील चित्रा यांचेच समर्थन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App