राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद हे नामांतर योग्यच; ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग याचे परखड मत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करणे हा निर्णय योग्यच असल्याचे मत ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता भारतीय हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी व्यक्त केले आहे.Major Dhyanchand of the Rajiv Gandhi Khel Ratna Award is apt; Olympic bronze medalist hockey captain Manpreet Singh’s opinion

हॉकीमध्ये भारताने माझ्या जन्माच्या आधी शेवटचे पदक मिळवले होते. तब्बल 41 वर्षांनंतर आम्ही भारतासाठी ऑलिंपिक पदक मिळवू शकलो. समस्त भारतीयांच्या सदिच्छा यासाठी आमच्या पाठीशी होत्या. मोठ्यांच्या आशीर्वादाने, कोचच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या मेहनतीने हे स्वप्न साकार झाले. या विषयी मनप्रीतने समाधान व्यक्त केले.



गेल्या चार-पाच वर्षांमध्ये भारतीय हॉकी खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीत सातत्य आणि अचूकता होती, असे प्रतिपादन भारतीय हॉकीचे कोच जॉन रीड यांनी व्यक्त केले आहे. भारतीय हॉकीपटूंच्या आत्मविश्वास ऑलिंपिक खेळताना प्रत्येक सामन्यागणिक दुणावत होता. हाच आत्मविश्वास कायम ठेवल्यावर भारताला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवणे शक्य आहे, असा विश्वास जॉन रीड यांनी व्यक्त केला आहे.

त्याच वेळी मनप्रीतनेही राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर भारताचे महान आणि सुपरस्टार हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचे देखील समर्थन केले. मेजर ध्यानचंद हे करोडो भारतीयांसाठी आणि क्रीडापटूंसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी भारताला ऑलिंपिक मधले सुवर्णयुग दाखविले होते, अशा भावना मनप्रीत सिंग याने व्यक्त केल्या. एकीकडे मनप्रीत सिंग आणि काही खेळाडू तसेच गेल्या ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळवलेला मल्ल योगेश्वर दत्त यांनी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर अनुकूल मत मत व्यक्त केले आहे.

त्याच वेळी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग याने मात्र त्यावर टीका केली आहे. सर्वकाही मोदींच्या प्रतिमावर्धनासाठी सुरू आहे, असे ट्विट विजेंदर सिंग याने केले आहे. अर्थात विजेंदर सिंग याने दिल्लीची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. सध्या तो काँग्रेस सदस्य आहे. त्यामुळे त्याने काँग्रेसच्या धोरणानुसार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर टीका करणे स्वाभाविक आहे.

Major Dhyanchand of the Rajiv Gandhi Khel Ratna Award is apt; Olympic bronze medalist hockey captain Manpreet Singh’s opinion

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात